AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू

शरद पवार यांना आज सकाळी अचानक अस्वस्थता आणि थकवा जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू
sharad pawar
| Updated on: Feb 22, 2026 | 10:12 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आता पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांना सलाईन लावले

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना थकवा आणि अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालवली आहे. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील काही मिनिटांतच त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणाखाली आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्ट बाकी आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही रुग्णालयात दाखल करत आहोत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप आभार, असेही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या व्हॉटसअॅप स्टेटसद्वारे म्हटले आहे.

काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला

दरम्यान मागील आठवड्यातही शरद पवार यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा