AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय, शरद पवारांची घोषणा

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार शरद पवार हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वाढली आहे. काल लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही म्हणणारे शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करुन दोन दिवसात उमेदवारीबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं.  सांगोल्यात सुरु असलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार […]

लोकसभा लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय, शरद पवारांची घोषणा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार शरद पवार हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वाढली आहे. काल लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही म्हणणारे शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करुन दोन दिवसात उमेदवारीबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं.  सांगोल्यात सुरु असलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी माढ्याचे विद्यमान खासदार  विजयसिंह मोहिते पाटील यांनी आजही केली. तत्पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आमदार गणपतराव देशमुख, आमदार  जयंत पाटील यांनीदेखील पवारांनी माढयातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली.

शरद पवार यांनी काल सोलापुरात बोलताना मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा असल्याचं म्हटलं होतं. “माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. माझी इच्छा नाही, पण विचार करु”, असं शरद पवार काल म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटल्याने, शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या 

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?   

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?  

बारामतीची जागा जिंकणारच, पवारांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान 

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश