AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू खरात प्रकरणात शर्मिला ठाकरेंच्या विधानाची चर्चा; म्हणाल्या त्यातील कोणती महिला…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजवली आहे. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भोंदू खरात प्रकरणात शर्मिला ठाकरेंच्या विधानाची चर्चा; म्हणाल्या त्यातील कोणती महिला...
शर्मिला ठाकरेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 08, 2026 | 3:19 PM
Share

गेल्या एक महिनाभरापासून राज्यात भोंदूबाबा प्रकरणाने खळबळ माजली आहे. लिंगपिसाट अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांच्यावर बलात्कार केला. आता अशोक खरात विरोधात जवळपास 13 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर खरातचे राजकीय वर्तुळातील अनेक बड्या व्यक्तींशी संबंध असल्याचे समोर आले होते. सध्या अशोक खरात प्रकरणी चौकशी सुरु असून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन आज शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पक्षाला अनेक वर्षांनंतर स्वतंत्र कार्यालय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आपली पहिली स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “राज्यात काय चाललंय? खरात बाबत बोलताना महिलांचे कान टोचले. त्याच्या सोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते, मात्र महिलांना कळायला पाहिजे आपण काय करतो.”

शर्मिला ठाकरे यांनी यावेळी एक नवीन खुलासाही केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा मनसेचे १३ आमदार निवडून आले होते, त्यावेळी अनेक बाबा भेटायला आले होते. “त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितले की, आम्ही त्यांच्या पाया पडणार नाही. या भेटा आणि जा,” असे आम्ही त्यांना सांगितले होते.

इंग्रजी सक्तीवर संताप

कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबई महापालिकेने सर्व शाळा इंग्रजी माध्यमात करण्याचा ठराव मंजूर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “मराठी शिकवा, असे सांगायला आपल्याला लाज वाटली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची भाषा शिकवली जाते, मग आपल्याकडेच असे का होते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवल्याची आठवण करुन दिली आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला असे देखील म्हटले.

Follow Us
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त