ग्रहणानिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या वेळेत बदल

कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला (Shirdi saibaba temple closed during grahan) आहे.

ग्रहणानिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या वेळेत बदल
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 4:53 PM

अहमदनगर (शिर्डी) : कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या निमित्ताने उद्या (26 डिसेंबर) शिर्डी साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन (Shirdi saibaba temple closed during grahan) कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. गुरुवारी 26 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 8.05 ते सकाळी 11 याकाळात कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने श्री साईबाबा समाधी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला (Shirdi saibaba temple closed during grahan) आहे.

नाताळच्या सुट्टीनिमित्ताने लाखो भाविक शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र उद्या सूर्यग्रहण असल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी तीन तास मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतरच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

तसेच ग्रहण काळात साईबाबा मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येईल. त्यानंतर 8.05 ते 11 वाजेपर्यंत मंत्रोच्चार होतील. त्यानंतर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी श्रींचे मंगल स्नान होईल. त्यानंतर 11.25 मिनिटांनी आरती होईल आणि दुपारी मध्यान्ह आरती (Shirdi saibaba temple closed during grahan) होईल.

सूर्यग्रहणारम्यान श्री साईसत्यव्रत आणि अभिषेक पूजा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यादरम्यान ऑनलाईन बुकिंग केलेल्या साईभक्तांकरिता सकाळी 7 ते 8 यावेळेत श्री साईसत्यव्रत आणि अभिषेक पूजेचे आयोजन करण्यात आल्याचं संस्थानाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

या ग्रहण काळात साईसमाधी आणि साई मुर्तीला दुर्वा-तुळशीचं आच्छादन घालण्यात येईल. त्यानंतर मंत्रोच्चार सुरू असतो. साईंच मंगलस्नान पार पडल्यानंतर मध्यान्ह आरती पार पडेल आणि त्यानंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल. असेही सांगण्यात (Shirdi saibaba temple closed during grahan) येत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.