अनुदानाची वाट न पाहता शिवभोजन सुरु, एकट्या शिवसैनिकाचा उपक्रम

सोलापुरात एका शिवसैनिकाने अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चातून शिवभोजन थाळी योजनेची (shiv bhojan thali scheme in solapur) सुरुवात केली आहे.

shiv sena corporator devidas koli start shiv bhojan thali scheme in solapur, अनुदानाची वाट न पाहता शिवभोजन सुरु, एकट्या शिवसैनिकाचा उपक्रम

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेनं सर्वसामान्य जनतेला दहा रुपयात सकस जेवणाची थाळी (shiv bhojan thali scheme in solapur) उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. दहा रुपयात सकस जेवण देणाऱ्या या योजनेचं नाव शिवभोजन थाळी योजना असं ठेवण्यात आलं होतं. या योजनेच्या बाबतीत अनेकांच्या मनात साशंकता असली तरी सोलापुरात एका शिवसैनिकानं कोणत्याही अनुदानाची अपेक्षा न करता स्वखर्चातून ही योजना (shiv bhojan thali scheme in solapur) सुरु केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय या शिवसैनिकाचं कौतुक देखील केलं जात आहे.

सोलापूरचे नगरसेवक देविदास कोळी यांनी स्वखर्चातून ही शिवभोजन थाळी योजना सुरु केली. सोलापुरातील नीलम नगर या परिसरातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. याशिवाय नीलम नगरच्या आजूबाजूच्या नगरातील नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्ष यांच्यावरील प्रेमाखातर आपण ही योजना स्वखर्चानं सुरु केली असल्याचं देविदास कोळी म्हणाले.

शिवभोजन योजनेअंतर्गत शहरी भागात 40 रुपये तर ग्रामीण भागात 20 रुपये सरकारी अनुदान मिळणार आहे. या अनुदानासाठी कागदावर थाळ्या वाढवून दाखवण्याचे प्रकार भविष्यात होतीलही मात्र सरकारच्या अनुदानाची वाट न पाहता देविदास कोळी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचं स्वागत होत आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2019 रोजी शिवभोजन थाळी योजनेचा शासन निर्णय काढण्यात आला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात सध्या एकच थाळी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा जीआर समोर आला आहे. या जीआरनुसार मुंबई शहर आणि उपनगरसाठी केवळ 1950 थाळ्यांची तरतूद करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *