AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीवरुन पुन्हा वाद, भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका

आता तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं (ShivJayanti dispute on date) आहे.

शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीवरुन पुन्हा वाद, भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका
| Updated on: Feb 04, 2020 | 11:58 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की, महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद सुरु होतो. आता पुन्हा तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली (ShivJayanti dispute on date) आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असं आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंनीही एकच शिवजयंती झाली पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचं सांगत शिवसेनेला डिवचलं आहे.

“राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली (ShivJayanti dispute on date) आहे.

शिवसेनेचं जर बोलायचं झालं तर शिवसेना आजवर तिथीनुसारच शिवजयंती साजरी करत आली आहे. गेल्यावेळी भाजपसोबत सत्तेत असतानाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजंयती साजरी करण्याची मागणी केली होती.

काही दिवसांआधीच शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजेंनीही दोन शिवजयंतीवरुन सेनेला सवाल केला होता.

दरम्यान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्राची ओळख आहे. त्यांच्याच जयंतीवरुन होणारा वाद दुर्देवीच म्हणावं लागेल. आता तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं (ShivJayanti dispute on date) आहे.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...