बेळगावात भगवा फडकवण्यावर शिवसैनिक ठाम, सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट

मात्र, येथे कर्नाटक पोलिसांकडून शिवसैनिकांना कर्नाटक सीमेवरच रोखण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं

बेळगावात भगवा फडकवण्यावर शिवसैनिक ठाम, सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 1:34 PM

कोल्हापूर : सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा (Shivsainik Vs Karnataka Police On Belgaon Border), अशी मागणी करत बेळगावमध्ये जाऊन आम्ही भगवा ध्वज फडकावणारच अशी गर्जना शिवसेने दिली होती. त्यानंतर आज दुपारी साडे-बारा बाजताच्या सुमारास शेकडो शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले. मात्र, येथे कर्नाटक पोलिसांकडून शिवसैनिकांना कर्नाटक सीमेवरच रोखण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं (Shivsainik Vs Karnataka Police On Belgaon Border).

यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटही झाली. शिवसैनिकांनी बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा देखील वापर केला. त्यामुळे शिवसैनिक आणि पोलीस आमनेसामने आले. मात्र, बेळगावात जाण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी बेळगावच्या सीमेवरच ठिय्या मांडला.

आम्हाला शिनोळीच्या मार्गाने शांततेत बेळगावात जाऊ द्या. अन्यथा आम्हाला गनिमी काव्याचा वापर करत बेळगावात प्रवेश घ्यावा लागेल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. मात्र, कर्नाटक पोलीस शिवसैनिकांना बेळगावात प्रवेश द्यायला तयार नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी सीमेवर ठिय्या मांडला. तसेच, मोठ्या प्रमाणात जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी, महाराष्ट्र पोलिसांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांशी चर्चा केली. तुम्हा आम्हाला तुमच्या मागण्या सांगा आम्ही त्या कर्नाटक सरकारपर्यंत पोहोचवू, असं पोलीस म्हणाले. मात्र, शिवसैनिक बेळगावात जाऊन भवगा फडकवण्याच्या निर्धारावर ठाम आहेत.

बेळगाव प्रश्नावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून उपाययोजना कराव्यात

बेळगाव प्रश्नावर न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चेतून काही उपाययोजना कराव्यात. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा करावी, असं मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दोन दिवसांपूर्वी राऊत बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरीही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला (Shivsainik Vs Karnataka Police On Belgaon Border).

बेळगवाच्या जनतेने 70 वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करलं. पोलीस केसेस झाल्या, डोकी फुटली. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास सोडेल. विशेषत: मराठी भाषा, संस्कृती, साहित्य या संदर्भातील ही लढाई आहे. हे टिकायला हवं आणि ते टिकेल असं मला वाटतं. कारण देशभरात आणि जगभरात मराठी भाषिक लोक राहतात. राजकारणाच्या दृष्टीने देखील त्यागोष्टी महत्त्वाच्या असतात, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Shivsainik Vs Karnataka Police On Belgaon Border

संबंधित बातम्या :

बेळगाव सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पांची शिखर परिषद व्हावी : संजय राऊत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.