गिरीश महाजनांसमोर शिंदेंच्या नेत्याची फटकेबाजी! संकटमोचक, लफडेबाज म्हणत डिवचले
राजकारणात सर्वात जास्त कुठल्या कामाचे समाधान तर ते म्हणजे रुग्ण सेवा, असे म्हणत त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आम्ही आहोत," असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना कोपरखळी लगावली.

Gulabrao Patil Speech Jalgaon: महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील भंगाळे यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेना नेते, मंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेत जोरदार फटकेबाजी केली.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“भाषणाच्या सुरुवातीला मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा ज्येष्ठ बंधू असा उल्लेख केला. मंत्री गिरीश महाजन यांचे वय ६७ तर माझे वय ६० आहे. राजकारणात सर्वात जास्त कुठल्या कामाचे समाधान तर ते म्हणजे रुग्ण सेवा, असे म्हणत त्रास देणाऱ्याला त्रास देणारे आम्ही आहोत,” असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरुवातीला एफडीच्या कारवाईवरुन जोरदार टीका केली.
“आमच्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात , घर नांदत नाही अशा देखील महिला येतात, त्यामुके आम्ही जनरल फिजिशियन सारखे काम करतो. 288 पैकी 265 आमदाराना बीपी आणि शुगर असे दोन्हीचा त्रास आहे. मला देखील बीपी शुगरचा त्रास तरीही 12 वाजेपासून मी गिरीश महाजन यांच्यासाठी उपाशी आहे, त्यांची कार्यमात वाट पहात बसलो,” असे म्हणत मंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाला तब्बल 1 तास उशिरा आल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला.
गिरीश महाजन संकटमोचक, लफडेबाज!
दरम्यान, “जिल्हा बँक निवडणुकीत माघारी आणि राजकारणावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील गुलाबराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्या समोर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या भाजपच्या उमेदवारांच्या माघारी व्हावी म्हणून मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजन यांना सुचना केली, तसेच गिरीश महाजन संकटमोचक आहे लय लफडेबाज माणूस आहे,” असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.