AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंशी गद्दारी? अरविंद सावंत यांनी थेट कागदावर लिहून दिलं… ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट

Operation Tiger : उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंशी गद्दारी? अरविंद सावंत यांनी थेट कागदावर लिहून दिलं... ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट
Arvind SawantImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 11, 2026 | 2:55 PM
Share

गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप पहायला मिळाले आहे. आधी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन भूकंप होणार आणि उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आठ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं बोललं जात आहे. या बातम्यांच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी आज दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना मातोश्रीवर बोलावले होते. या दोघांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना अरविंद सावंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सावंत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले अरविंद सावंत ?

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, खासदार फुटणार याबाबत चर्चा झाली नाही, उलट त्यांनी माझं कौतुक केलं. आजच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार नव्हती. आजची बैठकी ही शिवसेना आणि भारतीय कामकार सेनेच्या कारभाराबाबत होती. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की मी दैनंदिन मातोश्रीवर येतो. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मातोश्रीचा विश्वास आहे.’

उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार नाही असं लिहून का दिलं?

अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंशी प्रताडणा करणार नाही असं लिहून दिलं आहे. याबाबत विचारले असता सांवंत म्हणाले की, ‘असा काही विषय झाला नाही, त्यांनी सहज म्हटलं की लिहून देणार का? मी म्हटलं लिहून देतो, त्यात असं काही विशेष नाही. मी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. बोललो ते बोललो असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा मी शिवसैनिक आहे. तुम्ही म्हणालं बोलला मग लिहून का दिलं? लिहून दिलं नसतं तर माध्यमांनी वेगळी बातमी पसरवली असती. त्यामुळे लिहून दिलं आहे.’

अरविंद सावंत ठाकरेंचे विश्वासू

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून लोकसभेवर गेले आहेत. 2014 पासून ते खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार अशा चर्चा आहेत. अनेक खासदारांनी काहीही झालं तरी शिंदेंच्या शिवसेनेत जाणार नाही असं सांगितलं. अधिवेशन काळात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली होती. खासदारांना मार्गदर्शन केलं होतं.

Follow Us
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...