AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! मिरजमध्ये दोन लहान मुलांची विक्री, चार जणांवर गुन्हा दाखल, किती रुपयांमध्ये झाली विक्री?

40 हजार रुपयांना दोन पुरुष बालके दत्तक म्हूणून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील मिरजमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! मिरजमध्ये दोन लहान मुलांची विक्री, चार जणांवर गुन्हा दाखल, किती रुपयांमध्ये झाली विक्री?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 22, 2026 | 10:45 AM
Share

Miraj News : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना घडत आहेत. अशातच आता मिरजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्याने संपूर्ण मिरज शहरात भीतीचं वातावरण पसरल आहे. मिरज शहरात दोन लहान मुलांची प्रत्येकी 20 हजार रुपये दराने एकूण 40 हजार रुपयांमध्ये बेकायदेशीररीत्या दत्तक म्हणून विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्षाला मिळाल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर त्यांनी तातडीने चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

प्राथमिक तपासात सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या मनीषा जाधव हिने दोन पुरुष बालके 40 हजार रुपयांमध्ये दत्तक म्हणून दिल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न राबवता थेट पैशांच्या मोबदल्यात बालकांची विक्री केल्याचा आरोप आहे. तिच्याकडून सचिन लोंढे, सुरेखा आणि सचिन गोसावी यांनी ही दोन्ही बालके दत्तक घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

अधिकाऱ्यांची तक्रार, गुन्हा दाखल

या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संबंधितांविरुद्ध अल्पवयीन न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) या अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, महिलेकडून विक्री करण्यात आलेली दोन्ही बालके मिरज शहर पोलीस यांनी ताब्यात घेतली असून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पाठक अनाथ आश्रम येथे ठेवण्यात आले आहे. सध्या या बालकांच्या प्रकृती आणि सुरक्षिततेची काळजी घेतली जात असून त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे.

पुढील तपास सुरू

या घटनेमुळे मिरज शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर पणे मुले दत्तक घेतल्यामुळे या प्रकरणांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सध्या मिरज शहर पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर तेथील नागरिकांनी देखील या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा