AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या डॅमवर तो भेटायचा तिथेच स्वत:ला संपवायला गेली, अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणी खळबळजनक अपडेट समोर

अमरावतीमधील परतवाडा येथील सेक्स स्कँडल प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. लैंगिक शोषण झालेली एक तरुणी स्वत:ला संपवण्यासाठी डॅमवर पोहोचली होती.

ज्या डॅमवर तो भेटायचा तिथेच स्वत:ला संपवायला गेली, अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणी खळबळजनक अपडेट समोर
अमरावती सेक्स स्कँडलImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 20, 2026 | 1:31 PM
Share

सध्या राज्यातील अनेक ठिकाणी महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती जिल्हातील सेक्स स्कँडल समोर येताच अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आरोपीने अनेक महिलांवर लैंगिक शोषण करुन त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर त्याने ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. आता अमरवतीमधील परतवाडा जवळील वझ्झर डॅमवर एक तरुणी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पोहोचली होती. घटनास्थळी पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. तरुणीला वेळीच वाचवण्यात यश आले असले तरी, या घटनेने अमरावती सेक्स स्कँडल प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी तपास सुरू केला असून, तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, या तरुणीचा परतवाडातील ‘अयान प्रकरणा’शी काही संबंध आहे का, याचीही पोलिसांकडून सखोल तपासणी केली जाणार आहे. कारण आरोपी अयान हा मुलींना भेटण्यासाठी वारंवार याच वझ्झर डॅमवर घेऊन जात होता, अशी माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या आरोपीविरोधात देखील तक्रार

दुसरीकडे, याच अमरावती परतवाडा येथील तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणातील दुसरा आरोपी हुजेर खान (उर्फ उजेर खान) याच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल करून हा गुन्हा नोंदवला आहे. पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी आरोपीला समजून सांगितल्यानंतरही हुजेर खान त्या तरुणीला वारंवार फोन करून त्रास देत होता, अशी गंभीर बाब तक्रारीत समोर आली आहे. आरोपीने त्रास देणे थांबवले नाही, म्हणून आईने पोलिसांत धाव घेतली.

या दोन्ही घटनांमुळे अमरावती सेक्स स्कँडल प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची जोडणी तपासण्यास सुरुवात केली असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. परतवाडा परिसरात लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत स्थानिक स्तरावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...