भोंदू अशोक खरातचे ते व्हिडीओ वकिलांना दाखवा, पेन ड्राईव्ह सुपूर्द करा, न्यायालयाचे निर्देश; जामिनाविषयी महत्त्वाचे अपडेट!

Ashok Kharat Case : नाशिकच्या कोर्टात भोंदू अशोक खरात प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणीसाठी तपासी अधिकारी आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात उपस्थित होते.

भोंदू अशोक खरातचे ते व्हिडीओ वकिलांना दाखवा, पेन ड्राईव्ह सुपूर्द करा, न्यायालयाचे निर्देश; जामिनाविषयी महत्त्वाचे अपडेट!
Ashok Kharat Case
| Updated on: Sep 30, 2026 | 6:32 PM

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला महाराष्ट्राचे एपस्टीन फाईल म्हटले गेले. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. तसेच अनेक राजकीय लोकांशी अशोक खरात याच्या संबंध असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. आता या प्रकरणात नाशिक कोर्टात सुनावणी सुरु आहे. आज या प्रकरणात न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी आरोपींच्या वकीलांना अशोक खरात याचे पेनड्राईव्ह मधील व्हिडीओ दाखवण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात भोंदू अशोक खरात प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. एल. मोरे यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरोपीचे वकील राहुल कासलीवाल यांना पेनड्राइव्हमधील व्हिडीओ दाखवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सरकारी पक्षाने पेनड्राईव्ह आणि संबंधित कागदपत्रे वकिलांना द्यावीत असे आदेश देतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांचे पालन करण्यात यावे असे म्हटले आहे.

Loading...

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या आरोपी भोंदू अशोक खरात याला आज प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आले होते. अशोक खरात याला मास्क लावून कोर्टात आणण्यात आले होते. सरकारी पक्षाकडून तपासी अधिकारी आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात उपस्थित होते. या संदर्भात आरोपींचा वकीलांना सर्व कागदपत्रीय पुरावे देण्याचे आदेश कोर्टाने सरकारी पक्षाला दिले. व्हिडीओ पुरावे आरोपी आणि वकिलांना केवळ पाहता येणार आहेत. व्हिडीओची प्रत आरोपी किंवा वकिलांना देता येणार नाही असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. आरोपी खरात विरोधातील उर्वरित गुन्ह्यांची सुनावणी येत्या ८ ऑक्टोबरला होणार आहे.आरोपी भोंदू बाबा अशोक खरात याच्या पहिल्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर ३ ऑक्टोबरला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे आरोपी भोंदू अशोक खरात याच्या जामिनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us