AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर, गोकुळच्या निवडणुकीत रात्री मोठा राडा..

Gokul Election Result 2026 : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या. पार रात्री उशीरात सर्व गोष्टी सुरू होत्या. त्यातच सतेज पाटलांनी जोपर्यंत पूर्ण निकाल लागणार नाही, तोपर्यंत मतदान केंद्र सोडणार नसल्याची भूमिका घेतली.

थेट जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर, गोकुळच्या निवडणुकीत रात्री मोठा राडा..
Gokul election
| Updated on: Oct 20, 2026 | 9:18 AM
Share

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी बघायला मिळाल्या. रात्री उशीरा यादरम्यान फुल ड्रामा सुरू होता. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील त्यांच्य पॅनलने बाजी मारली. एकूण 25 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील 13 जागांवर सतेज पाटील यांचे उमेदवार तर 12 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. मात्र, जिंकलेल्या उमेदवाराला पराभूत म्हणून घोषित केले. ज्याने एकच खळबळ उडाली. गोकुळच्या निवडणुकीत शेवटी मोठा राडा झाला. या निवडणुकीत सतेज पाटलाविरोधात थेट खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र, मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागला. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने मोठी लढत दिली. ज्याचा कोणीही विचार केला नाही, असा विजय यांचा झाला. हेच नाही तर नवीद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांच्या पराभवामुळे महायुतीला थेट धक्का बसला.

त्यातच विश्वास पाटील आणि युवराज पाटील यांचा फेरमतमोजणीचा अर्ज फेटाळण्यात आला. दिवसभरात गोकुळच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडताना दिसल्या. शौमिका महाडिक यांचा फक्त सात मतांनी पराभव झाला. सुरूवातीला गोकुळचा निकाल 14-11 असा सांगितला जात होता. सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे सचिन घोरपडे विजयी झाले होते.

पण फेरमतमोजणीत सचिन घोरपडे यांचा पराभव झाला. महायुतीचे प्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे अमर पाटील यांचा विजय झाला. सतेज पाटलांच्या पॅनलचा एक जिंकलेला उमेदवार पराभूत झाला. सतेज पाटलांचा विजयी झालेला उमेदवार पराभूत झाला. ज्यामुळे निकाल हा 13-12 असा झाला. यादरम्यान मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ बघायला मिळाला.

या सर्व गोंधळात सतेज पाटील यांनी मतमोजणी केंद्र गाठले. सतेज पाटील येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे गराडा घातला. अधिकृत निकाल लागणार नाही, तोपर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका सतेज पाटलांनी घेतली. या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. नक्की काय होणार हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हते. प्रतिष्ठित राजकीय नेत्यांनी या निवडणुकीसाठी आपली पूर्ण प्रतिष्ठा लावली होती.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष