सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीचा छळ; पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

सिंधूताई सपकाळ यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीचा छळ; पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
amravati news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 20, 2026 | 8:23 AM

अमरावतीमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरामध्ये दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या मुलाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण सपकाळ यांच्या विरोधात गंभीर आरोप झाल्याने सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चिखलदारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

चिखलदरा पोलिसांकडून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

Loading...

मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचा मुलगा अरुण सपकाळ यांच्या मुलाविरोधात एका मुलीने गंभीर आरोप केला आहे. एका अल्पवयीन मुलीने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी अरूण सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पोलिसांकडून पॉक्सो आणि विनयभंगासह विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या जबाबावरून गुन्ह्याची नोंद केली आहे. अरुण सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे.

नांदेडमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याविरोधात मोठी कारवाई 

नांदेमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांवर चार्जशीट दाखल नांदेडमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोन नराधमांवर अवघ्या ४८ तासांत चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेवर हल्ला करीत विनयभंग केला होता. पोलिसांनी आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या होत्या. मुलीला शाळेत पाठवण्याच्या कौटुंबिक वादात हस्तक्षेप करीत महिलेचा विनयभंग आरोपींनी केला होता. आरोपी प्रल्हाद मोकमपल्ले आणि गजानन मोकमपल्ले यांच्याकडून महिलेला मारहाण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास वेगाने पूर्ण करत अवघ्या ४८ तासात केले न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. महिला सुरक्षेबाबत नांदेड पोलिसांनी तत्परता दाखवत मोठी कारवाई केली आहे. यामुळे नांदेड पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे.  आता त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us