प्रणिती शिंदेंना एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर…; राम सातपुते यांची जोरदार टीका

| Updated on: Apr 07, 2024 | 4:02 PM

Ram Satpute on Praniti Shinde and Loksabha Election 2024 : भाजप उमेदवाराचं प्रणिती शिंदेंवर टीकास्त्र... राम सातपुते यांची काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदेवर टीका... सोलापुरात बोलताना नेमकं काय म्हणाले? लोकसभेच्या निवडणुकीवर राम सातपुते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रणिती शिंदेंना एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर...; राम सातपुते यांची जोरदार टीका
Follow us on

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते मतदारसंघात दौरा करत आहेत. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचार दौरा ते करत आहेत. माजी नगरसेवक आनंद जाधव यांनी राम सातपुते यांचे पगडी आणि तलवार देऊन स्वागत केलं. यावेळ राम सातपुते यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. प्रणिती शिंदे यांनी विद्यमान खासदारांची दहा कामं दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्याला राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.

प्रणिती शिंदेंच्या टीकेला उत्तर

प्रणिती शिंदे यांच्या जीएसटीच्या विधानाला राम सातपुतेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रणिती शिंदे यांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर त्यांनी आपलं अज्ञान तरी दाखवू नये. त्यांच्यात अभ्यासाची प्रचंड मात्र कमतरता आहे. मी एक उच्च शिक्षित उमेदवार आहे. विकास कामे केलेला आमदार आहे. मात्र समोरचा उमेदवार काही बोलू द्या आम्ही विकासावरच बोलणार, असं म्हणत राम सातपुते यांनी प्रणिती शिंदेच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

मी केवळ विकासावर बोलणार- राम सातपुते

प्रणिती शिंदे यांनी टीका करताना आमच्या खासदारांची दहा कामं सांगा म्हटलं होतं. मात्र मी त्यांना 25 कामे सांगितली आहेत. प्रणिती शिंदे यांनी मोदीजींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका आणि राजकारण केलं आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र आम्हाला सोलापूरचा विकास करायचा आहे. समोरचा उमेदवार काय बोलला, काय टिपण्णी केली यात आम्ही जाणार नाही, असं राम सातपुते म्हणाले.

मी प्रणिती शिंदे यांना चॅलेंज दिलं होतं की, भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ताही कोणत्याही चौकात विकासाची कामे सांगायला तयार आहे. त्यासाठी माझी आवश्यकता नाही. माझा छोटा कार्यकर्ताही मोदीजींनी काय केले ते सांगेन, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीवर म्हणाले…

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. भाजपचा बूथ लेव्हलचा कार्यकर्ता क्षमतेने काम करत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. सोलापुरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी जी काम केली आहेत. त्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर शहराच्या पाण्यासाठी समांतरण जलवाहिनीचे काम चार महिन्यात पूर्ण होईल. मोठ्या प्रमाणावर विकासची गंगा मोदींमुळे सोलापुरात आली आहे. त्यामुळे सोलापुरात महायुतीच जिंकणार यात शंका नाही, असं राम सातपुते म्हणाले.