heat waves : विदर्भात जून महिन्यातही तीव्र उन्हाचे चटके; पुढील दोन दिवस रेड अलर्ट

| Updated on: Jun 06, 2022 | 6:03 PM

विदर्भातील काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी तापमान 47 अशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगितलं आहे.

heat waves : विदर्भात जून महिन्यातही तीव्र उन्हाचे चटके; पुढील दोन दिवस रेड अलर्ट
विदर्भ
Image Credit source: tv9
Follow us on

विदर्भ : सध्या जून महिना सुरू असून अनेकांना पावसाची ओढ लागली आहे. तर मान्सूनच्या आगमनाआधी अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (unseasonal rains) झोडपून काढले आहे. मात्र आता मान्सून लांबणीवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच तीव्र उन्हाचे चटके अख्या विदर्भाला बसताना दिसत आहे. त्यामुळे विदर्भातील लोक हे हैराण झाले आहेत. त्याचदरम्यान वाढत्या गर्मीमुळे तर उष्णतेच्या लाटेमुळे हवामान विभागाकडून (meteorological department) पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील (Vidarbha) वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा यांनी तीव्र उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.

तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता

विदर्भाच्या विविध जिल्ह्यात जूनमध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मे महिना संपला तरी आणि जून महिना आला तरी येथील तापमानात वाढ होत आहे. वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या उष्णतेची लाट असल्याचेच समोर येत आहे. जुन महिना लागला तरी विदर्भातील नागरिकांची उष्ण वारे आणि तीव्र उन्हापासून सुटका झालेली नाही. उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांमुळे सध्या विदर्भातील तापमान वाढलं आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी तापमान 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगितलं आहे. मे महिना संपला की जून महिन्यात विदर्भातील तापमान कमी व्हायला लागतं. मात्र यंदा जुनमध्येही उष्णतेच्या झळा कायम आहेत. त्यात मान्सूनसाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार असल्यानं विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिर्देशक मोहन साहू यांनी सांगितलं आहे.

विर्भातील जिल्ह्यांना मान्सूनची प्रतिक्षा

विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता विर्भातील जिल्ह्यांना मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. तर पाऊस नसल्याने पेरणीपूर्व मशागतींच्या कामाचा वेग ही मंदावला आहे. तसेच आणखी काही दिवस विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान असेच कायम राहणार असल्याचे हवामान अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

तर यंदाचा एप्रिलचा महिना विदर्भासाठी तापदायक ठरणारल्याचा दिसत आहे. मार्चनंतर मे आणि त्यानंतर जूनमध्ये विदर्भाच्या डोक्यावर असणारा सूर्य हा मध्य प्रदेश व राजस्थानकडे सरकत जातो आणि विदर्भाला वेध लागतात ते पावसाचे. पण यंदा मात्र विदर्भाचे चटके काही कमी होताना दिसत नाही. या महिन्यात सरासरी तापमान 42 ते 45 अंशांपर्यंत पोहोचते; तर कधीकधी ते 47 अंशांच्या पार गेले आहे.