AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Intensive Revision : नाव नोंदणीसाठी अधिकारी आल्यावर काय कराल? निवडणूक आयोगाने सांगितल्या चार गोष्टी; नोंद करून ठेवा

भारतीय निवडणूक आयोग (ECI) मतदार ओळखपत्रे अद्यावत करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) नावाची एक विशेष मोहीम चालवत आहे. तुमच्या घरी अधिकारी येण्याआधी ही प्रक्रिया करावी...

Special Intensive Revision : नाव नोंदणीसाठी अधिकारी आल्यावर काय कराल? निवडणूक आयोगाने सांगितल्या चार गोष्टी; नोंद करून ठेवा
Special Intensive Revision
| Updated on: May 22, 2026 | 4:04 PM
Share

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदत घेत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन ( SIR ) मोहिमेची माहिती दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणे सोपे आहे. तुम्ही कुठेही असला तरी चालेल. तुमचे मतदार यादीत नाव तु्म्हाला पाहाता येईल. निवडणूक आयोगाने वेबसाईटमध्ये संपूर्ण देशाच्या राज्यांची यादी दिली आहे. राज्य, जिल्हा निवडून बघा. तुम्ही कोणत्या भागात मतदान केले हे तुम्हाला जर माहीत नसेल,पण तुमच्या मतदारसंघाचे नाव आठवत असेल तर तुमचे नाव टाकून शोधलं तर तुमचं नाव तुम्हाला मिळेल असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन ( SIR ) मोहिमेसाठी तुमच्या घरी नाव नोंदणीसाठी जेव्हा   अधिकारी आल्यानंतर काय करायचे ते स्टेप वाईज पाहूयात….

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत मतदार गणना फॉर्म भरणे आणि सबमिट करणे आता पूर्णपणे ऑनलाईन केलेले आहे. घरी बीएलओ येणार त्यावेळी नेमके काय करावे याची माहिती आज राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

तुम्ही आज कुठेही असेल तरी चालेल. तुमचं मतदार यादीत नाव येईल. निवडणूक आयोगाने वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या राज्याची यादी दिली आहे. वेबसाईटमध्ये  तुमचं राज्य, जिल्हा निवडून बघा. तुम्ही कोणत्या भागात मतदान केलं हे तुम्ही माहीत नसेल. पण तुमचा मतदारसंघाचं नाव आठवत असेल तर तुमचं नाव टाकून शोधलं तर तुमचं नाव मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तुम्ही कोणत्या राज्यातील आणि कोणत्या मतदारसंघात मतदान केले होते हे सांगितलं तर तुमचं नाव शोधता येईल. त्यामुळे ती नावे अधिकाऱ्यांना द्या. संगणकातून तुम्ही शोधत आणि  काढत असाल तर आम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा आणि  तर तुमचं राज्य, मतदारसंघ, जिल्हा आणि बुथ तसेच सीरिअल नंबर शोधून काढले तर आम्हाला ते बरं पडेल असे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एसआयआरला संदर्भात लोकांमध्ये गोंधळ आहे. या मोहिमेंतर्गत ३० जूनपर्यंत  तुमच्या घरी  बीएलओ येतील. तुमच्याकडे माहिती मिळाली नाही तर निवडणूक आयोगाने ११ सर्टिफिकेट सांगितलेली आहेत. त्यातील एक सर्टिफिकेट दाखवावे. तुम्ही नागरिक असल्याचे आणि जन्म ८७ पूर्वी जन्म झाल्याचा पुरावा द्या. काय सर्टिफिकेट एड करायचं ते सांगा. ११ सर्टिफिकेट आखून दिलेली आहेत. त्या व्यतिरिक्त सर्टिफिकेट असेल तर कळवा. मॅपिंग असेल तर कागदपत्रे देण्याची गरज नाही. मॅपिंग नसेल तर कागदपत्रे द्यावी लागतील. ११ पैकी एक डॉक्यूमेंट दाखवायचं आहे असेही राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

एखाद्याचं नाव २०११ मध्ये असेल पण त्याचं आडनाव जुळत नसेल. ते डिस्क्रिपन्सीत येतं. तसं असेल तर संबंधित कागदपत्रे दिले पाहिजे. उदा. लग्नानंतर नाव बदललं असेल तर लग्न पत्रिका दाखवावी. हा पुरेसा पुरावा आहे असेही ते म्हणाले.

एक महिना कोणी आपल्या गावात नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणीही सही करू शकते.  समजा महिनाभर नसाल तर ड्राफ्ट प्रसिद्ध केल्यावर फॉर्म नंबर ६ भरून द्यायचा आहे. डिक्लेरेशन द्यायचे आहे. १ महिन्यात तुम्ही नोंदणी करा. पण ड्राफ्ट यादीत तुमचं नाव नसेल तर तुमचा हक्क जात नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सर्व राजकीय पक्षांना सांगितलेले आहे. आमच्या बीएलओसोबत मदत करण्यासाठी पारदर्शकता ठेवण्यासाठी माणसं द्यायला सांगितले आहे. १ लाख १३ हजार बीएलओ सर्व पार्टी मिळून आहेत. काही पक्षांनी ६० हजार नेमले आणि काहींनी ३० हजार नेमले आहेत असेही त्यांनी सांगितले.

नाव नोंदणीसाठी आल्यावर काय कराल

निवडणूक आयोगाच्या साईटवरून खालील गोष्टी काढून ठेवा

राज्य,

जिल्हा,

मतदारसंघ,

बुथ

सीरिअल नंबर

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ