AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हणण्याची सक्ती ? पालकांचा गंभीर आरोप

कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांवर ख्रिश्चन प्रार्थना म्हणण्याची सक्ती केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शाळा प्रशासनाला जाब विचारला असून कारवाईची मागणी केली आहे. पालकांनी रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला आहे, तर शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आहे.

कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची प्रार्थना म्हणण्याची सक्ती ? पालकांचा गंभीर आरोप
| Updated on: Sep 29, 2026 | 6:10 PM
Share

रवी खरात , रिपोर्टर : पनवेलच्या कळंबोली येथून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तेथील सेंट जोसेफ शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून ख्रिश्चन धर्माशी संबंधित प्रार्थना जबरदस्तीने म्हणवून घेतली जात आहे, असा आरोप काही पालकांनी केला आहे. येशूशी संबंधित प्रार्थना पाठ करून येण्याबाबत विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये संदेश जात आहे, असाही दावा पालकांकडून करण्यात येत आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या आरोपानंतरं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाच भेट घेतली आणि जाब विचारत याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मात्र असं असलं तरी सेंट जोसेफ शाळा प्रशासनाने यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अक्षय देवकर यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला आहे. शाळेतील विद्यार्थयांवर कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित प्रार्थना म्हणण्याची अथवा ती पाठ करण्याची सक्ती केली जाऊ नये, अशी मागणी देवकर यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आणि पालकांच्या भावनांचा विचार करून शाळा प्रशासनाने या प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

पालकांनी केले गंभीर आरोप

यासंदर्भात पालकांकडूनही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “ माझी मुलगी ही याच शाळेत शिकते. विद्यार्थ्यांकडून ही प्रार्थना जबरदस्तीने म्हणवून घेतली जाते. आमच्याकडे यासंदर्भातील रेकॉर्डिंग असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना येशूचं गाणं म्हणण्यास सांगितलं जात असल्याचे ऐकू येतंय,” असा दावा याप्रकरणी एका पालकाने केला.

दरम्यान, या आरोपांनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला आहे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही विशिष्ट धर्माची प्रार्थना लादली जात असल्यास ती तातडीने थांबवावी, अशी मागणीत्यांनी केली. तसेच या प्रकरणी योग्य ती स्पष्टता दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन कर, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

शाळा प्रशासनाने फेटाळले आरोप

मात्र पालक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जे आरोप केलेत, शाळा प्रशाससाने ते फेटाळून लावले आहेत. आमच्या शाळेत कोणत्याही विशिष्ट धर्माचं नाव घेऊन प्रार्थना घेतली जात नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या प्रकरणाबाबत सविस्तर अधिकृत माहिती देण्यास शाळा प्रशासनाने नकार दिला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय