AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, आंदोलकांची भूमिका न घेणं लज्जास्पदः अ‍ॅड गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

संजय राऊत फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, आंदोलकांची भूमिका न घेणं लज्जास्पदः अ‍ॅड गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
आझाद मैदानावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 25, 2021 | 12:45 PM
Share

मुंबईः आझाद मैदानावर आज एसटी महामंडळाच्या वतीने हायकोर्टात भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadawarte) यांनी पहिली पत्रकारपरिषद घेतली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (SadaBhau Khot) यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याचे चित्र दिसल्यानंतर सदावर्ते यांनी पत्रकार आणि आंदोलकांना संबोधून ही परिषद घेतली. यावेळी विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील. खोत आणि पडळकर यांनी माघार घेतली असली तरीही हा लढा थांबणार नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. ही पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

संजय राऊत हे फक्त शिवसेनेसाठी रोखठोक, हे लज्जास्पद!

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आंदोलनात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणारे अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले. तसेच संजय राऊत हे माझे मित्र आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. इथे घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली.

पडळकर, खोत आंदोलनातून ‘आझाद’

यावेळी बोलताना अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना आपण आझाद करत आहोत, असे म्हटले. तसेच आंदोलकांकडून त्यांनी सामुहिक शपथही घेतली. जोपर्यंत एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन होत नाही, तोपर्यंत मी सर्व कुटुंबासोबत या लढ्यात सामील होत आहे, अशी प्रतिज्ञा यावेळी त्यांनी आंदोलकांकडून घेतली.

आंदोलनाचं नेतृत्व बदलतंय, दिशा बदलतेय

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर हायकोर्टात कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे गुणरत्न सदावर्ते यांनी अशा प्रकारची जाहीर पत्रकार परिषद घेण्यावरून हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळीच दिशा घेणार हे स्पष्ट झालंय. येत्या 20 डिसेंबर रोजी न्यायालयानं नेमलेल्या समितीचा अहवाल सादर होईल. तोपर्यंत या आंदोलनाला आणखी कोण-कोणते नेते मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर बातम्या-

‘अमराठी म्हणून सहकलाकारांनी माझा छळ केला’, ‘शेवंता’नंतर आणखी एका प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीचा मोठा आरोप!

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडणार? गुणरत्न सदावर्ते येताच आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला