AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडणार? गुणरत्न सदावर्ते येताच आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी

एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं सांगितलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम आहेत.

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडणार? गुणरत्न सदावर्ते येताच आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी
सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 9:57 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. मात्र, आझाद मैदानावर मागील 15 दिवसांपासून ठाण मांडून बसलेले एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका जाहीर करु असं सांगितलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने हायकोर्टात लढा देणारे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते विलिनीकरणावर ठाम आहेत. (possibility of two groups falling into the ST workers’ movement)

बैठकांचं सत्र पार पडल्यानंतर बुधवारी संध्याकाळी अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगारवाढीची घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. त्यावेळी पडळकर आणि खोत यांना पत्रकारांनी सरकारचा निर्णय मान्य आहे का? असा सवाल केला. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन कर्मचाऱ्यांसमोर सरकारचा प्रस्ताव मांडू. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याशी चर्चा करुन संपाची पुढील दिशा स्पष्ट करु, असं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेनंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानावर दाखल झाले. त्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आजची रात्र आम्ही आझाद मैदानावरच घालवणार आहोत. प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करुन आंदोलनाची पुढील दिशा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर करु, असं पडळकर आणि खोत यांनी सांगितलं.

विलिनीकरणाशिवाय माघार नाही- सदावर्ते

काही वेळानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते आझाद मैदानावर दाखल झाले. सदावर्ते यांचं आगमन होताच आझाद मैदानात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व आता पडळकर आणि खोत यांच्याकडून सदावर्तेंकडे आलं का? असं चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी विलिनीकरणाशिवाय माघार नाही, अशी घोषणाच सदावर्ते यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता आझाद मैदानात दोन वेगळे गट तयार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे एसटी कामगारांच्या आंदोलनात आता फुट पडली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अनिल पराबांची पगारवाढीची नेमकी घोषणा काय?

‘संप दिवसेंदिवस लांबत असल्यामुळे सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे असावेळी काय करायचं याबाबत सतत विचार करत होतो. नंतर याबाबत आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माझे सहकारी उदय सामंत यांनी यात बरंच मोठं काम केलं. यावर सरकारतर्फे आम्ही एक प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने राज्य सरकारनं दिला तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय़ येईपर्यंत हा तिढा कायम ठेवता येणार नाही. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या निर्णय घेतलाय. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे, अशी घोषणा परब यांनी केलीय.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार?

1 ते 10 वर्षे सेवा- मूळ वेतनात 5 हजाराची वाढ, त्यामुळे मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्याचं वेतन आता 17 हजार 395 रुपये. त्याचं पूर्ण वेतन जे 17 हजार 80 रुपये होतं ते आता 24 हजार 594 रुपये झालं आहे. साधारण 7 हजार दोनशे रुपयांची म्हणजे एकूण 41 टक्के वाढ.

10 ते 20 वर्षे सेवा – मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ. ज्यांचा पगार 16 हजार रुपये होता त्यांचा पगार 23 हजार 40 रुपये झाला. त्यांचा पूर्ण पगार आता 28 हजार 800 रुपये झालाय.

20 वर्षे आणि त्याहून अधिक सेवा – 2 हजार 500 रुपयांची वाढ. ज्यांचं मूळ वेतन 26 हजार रुपये होतं आणि त्यांचं स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये होतं. त्यांचा पूर्ण पगार आता 41 हजार 40 झालं आहे. ज्यांचं मूळ वेतन 37 हजार होतं आणि स्थुल वेतन 53 हजार 280 रुपये होतं. त्यांचा मुळ वेतन 39 हजार 500 होईल, तर सुधारित वेतन 56 हजार 880 रुपये होईल.

इतर बातम्या :

ST WORKER STRIKE : ST कर्मचाऱ्यांचा आजचा मुक्कामही आझाद मैदानातच, संपाबाबत उद्या 11 वाजता निर्णय-खोत

VIDEO: विलीनीकरण ते ऐतिहासिक पगारवाढ… अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

possibility of two groups falling into the ST workers’ movement

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.