AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

St Worker Protest : गृहखात्यासाठी भाजपवर आरोप करणाऱ्यांचाच हात? हल्ल्याच्या आरोपावरून मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

आंदोलनावरून (St Worker Protest) आरोप प्रत्यारोप शिगेलो पोहोचले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आंदोलनाप्रकरणी थेट भाजपकडे इशारा केला आहे. तर संजय राऊतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

St Worker Protest : गृहखात्यासाठी भाजपवर आरोप करणाऱ्यांचाच हात? हल्ल्याच्या आरोपावरून मुनगंटीवारांचा राऊतांना टोला
संजय राऊतांना मुनगंटीवारांचा अप्रत्यक्षरित्या टोलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 3:24 PM
Share

चंद्रपूर : शुक्रवारी शरद पवारांच्या (Sharad Pawar)  मुंबईतील घरांवर झालेल्या आंदोलनावरून (St Worker Protest) आरोप प्रत्यारोप शिगेलो पोहोचले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आंदोलनाप्रकरणी थेट भाजपकडे इशारा केला आहे. तर संजय राऊतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. राज्यात सध्या राजकीय धुक्याचे वातावरण असून सामान्य माणसांचे प्रश्न मागे पडल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर पवारांच्या घरावरील हल्ल्यात भाजपचा हात असू शकतो हे बोलणं म्हणजे, हा हास्यास्पद प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गृहखाते आणि गृहखात्याच्या भूमिकेवरून सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यावरूनही मुनगंटीवारांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेनेला गृहखातं हवं आहे?

दिलीप वळसे पाटील यांच्याकडून गृह खाते काढून सूडाच्या राजकारणासाठी शिवसेनेला हवे आहे म्हणून केलेला डाव तर नाही ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. तसेच पुढच्याच आठवड्यात विशेष अधिवेशन बोलावून कोणाच्याही घरावर आंदोलने, निदर्शने, हल्ले करता येणार नाही. यासाठी कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे केले आवाहनही त्यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर चिंतन गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. राज्याच्या पोलिस दलावर 21 हजार कोटी एवढा वाढीव खर्च झाला असताना आता दलाने हल्ल्यातील सत्यता बाहेर आणण्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे, एसटी विलीनीकरणास संदर्भात सत्ताधाऱ्यांचा शपथनामा स्पष्ट असून सत्ताकर्त्यांनी तो तरी वाचला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

गृहखात्यावर पुन्हा सवाल उपस्थित

या हल्ल्यामधून नेत्यांविषयीची घृणा निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे अहंकार सोडा असे आवाहन त्यांनी उद्धव ठाकरे यांना केले. पोलीस खातं कमी पडल्याचे अनेक नेत्यांनी थेट बोलून दाखवलं आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनीही पोलिसांना याची माहिती कशी नव्हती, त्यांना याची माहिती असायला हवी होती, असे म्हणत राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहख्यावरच सवाल उपस्थित केले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi: मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो, पण मला सत्तेत स्वारस्य नाही: राहुल गांधी

Ajit Pawar Pune : ‘लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार’; पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंना टोला

Udyanraje On Pawar : कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.