Ajit Pawar Pune : ‘लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार’; पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंना टोला

ओबीसींनासुद्धा (OBC) जागा मिळायला हव्यात म्हणून आमचे सरकार (Government) प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. वारजे माळवाडी येथे स्व. सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

Ajit Pawar Pune : 'लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार'; पुण्यातल्या कार्यक्रमात राज ठाकरेंना टोला
पुण्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 12:48 PM

पुणे : बहुतेक महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांच्या मुदती संपल्याने तिथे प्रशासक आलेत. ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका पुढे गेल्यात. ओबीसींनासुद्धा (OBC) जागा मिळायला हव्यात म्हणून आमचे सरकार (Government) प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. वारजे माळवाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, की शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव केवळ भाषणात घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचार कृतीत आणला पाहिजे. यावेळी त्यांनी भावनिक मुद्द्यांवरून राजकारण करणाऱ्यांवरही टीका केली. लोकांना भावनिक बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हा प्रकार आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, ही आपली शिकवण, परंपरा आहे. काम करताना चुकले तर समजावून सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले.

‘काल जे मुंबईत झाले ते वाईट होते’

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. त्यावर अजित पवार म्हणाले, की मला कळत नाही, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर गुलाल उधळला, पेढे वाटले मग कोणाच्या सांगण्यावरून हे घडले? हे घडले तेव्हा पोलीस यंत्रणा काय करत होती, मीडियाला माहीत होते, मग पोलीस काय करत होते? याची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करायला सांगितली आहे. जाणीवपूर्वक हे वातावरण तयार केले गेले, असेही ते म्हणाले.

‘बाकीच्यांनी हट्ट धरू नका’

एका एका प्रभागात सात-सात आठ-आठ ताकदीचे कार्यकर्ते आहेत. त्यातल्या तिघांनाच मला तिकीट देता येणार आहे. तेव्हा बाकीच्यांनी हट्ट धरू नये, आम्हालाही समजून घ्यावे. निवडणुका लागतील तेव्हा लागतील, तुम्ही काम करत राहा, असे ते म्हणाले.

‘मुळा-मुठा नदीच पुनरुज्जीवन व्हायला हवे’

मुळा-मुठा नदीच पुनरुज्जीवन व्हायला हवे. पण यावर पर्यावरणवादी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेत. त्याचा विचार करावाच लागणार आहे, असे ते म्हणाले. तर बरेच पक्ष भूमिपूजन करून राजकीय फायदा घेण्याच काम करत असतात. मलादेखील काही अधिकारी म्हणतात, दादा आपण भूमिपूजन करून घेऊ. मला स्वतःला हे पटत नाही, असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

आणखी वाचा :

तुमचे कॅमेरे पोहोचतात, पण आमचे पोलीस पोहचत नाहीत; पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी महसूल मंत्री थोरातांचा आहेर

कर्म असतं, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं उदयनराजेंकडून समर्थन

नाशिक महापालिकेच्या घरपट्टीत 45 लाखांचा घोटाळा; आयुक्तांची कारवाई, महिला लिपिक निलंबित

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.