AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी महामंडळाचा प्रवाशांना मोठा दणका, बसच्या भाड्यात वाढ, 15 तारखेपासून नवे दर लागू

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात महागाई वाढत असतानाच आता प्रवाशांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाचा प्रवाशांना मोठा दणका, बसच्या भाड्यात वाढ, 15 तारखेपासून नवे दर  लागू
एसटीच्या भाड्यात वाढ Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 3:10 PM
Share

एसटी बस अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बस सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा आधार असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासाठी आजही अनेकजण लालपरीलाच प्राधान्य देतात. एसटीचा प्रवास हा सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. त्यामुळे प्रवाशांचा एसटी बसच्या प्रवासावर विश्वास आहे. मात्र आता राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. एसटी महामंडळाकडून बसच्या भाड्यात हंगमी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या 15 एप्रिलपासून प्रवाशांकडून सुधारीत दराने तिकीट आकारण्यात येणार आहे. महागाईमुळे सर्वसामन्य लोक आधीच हैराण आहेत, त्यात आता राज्य परिवहन महामंडळाने देखील प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे.

प्रवाशांची नाराजी  

दरम्यान एसटी महामंडळानं आता एसटीच्या भाड्यात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या भाड्यामध्ये 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपासून एसटीचे नवे दर लागू होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना प्रवाशांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. एसटीच्या या निर्णयावर प्रवाशांकडून संप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळत आहे.  ‘महिलांसाठी अर्ध टिकीट करता आणि इकडे प्रवास भाडे वाढवता, त्यापेक्षा एसटीच बद करू टाका.  श्रीमंत लोक एसटीने प्रवास करत नाहीत, भाव वाढ ही गरिबांच्या खिशाला कात्री आहे.  तिकटाची दरवाढ कमी करून गरिबांना दिलासा दिला पाहिजे. ‘  अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.

उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता  

मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्यात प्रवासाचा बेत आखत असतात.  एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. मात्र ऐन याच काळात आता एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका हा आता प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. प्रवाशांना भाडेवाढीमुळे मोठी आर्थिक झळ बसणार आहे. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....