अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा : सुशीलकुमार शिंदे

अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी  आहे, माझ्यासारख्या  माणसावरही  जादू  केली होती, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde on Modi wave) म्हटलं. ते सोलापुरात बोलत होते.

Sushilkumar Shinde on Modi wave, अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी  आहे, माझ्यासारख्या  माणसावरही  जादू  केली होती, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde on Modi wave) म्हटलं. ते सोलापुरात बोलत होते. सुशीलकुमार शिंदेच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Sushilkumar Shinde on Modi wave)

यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “शिवसेनेसारख्या पक्षाला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ठ करुन महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलर सरकार आणलं. ही  सुरुवात आहे. म्हणून आता जास्त जबाबदारी वाढली आहे. गावागावातील तरुण पोरं….मला माहितीय की अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी आहे. त्यांनी जादू आमच्यावर केली होती. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की ते चांगलं काम करतायत. पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धर्मा-धर्मात वेडी वाकडी भूमिका घेऊन देश बिघडवण्याचं काम सुरु आहे”.

त्यामुळे आपण अतिशय सावध असलं पाहिजे. आपण टीव्हीवर ऐकलं असेल, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. मोदींनी भाषण करुन त्यांचं स्वागत केलं. सगळं भाषण जर आपण ऐकलं असेल, तर ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीविषयीचं आहे. म्हणून कुणीतरी विचारलं, तुम्हाला ट्रम्प पाहिजे की अमेरिकन जनता पाहिजे. वैयक्तिक मैत्री दोघांची असू शकते, पण अमेरिकन जनता आपल्या पाठीशी आहे की नाही हा आमचा सवाल आहे, असं शिंदे म्हणाले.

ज्या इंदिरा गांधींनी निक्सन अमेरिकेचे अध्यक्ष असताना, थोडासा प्रोटोकॉल डावलला म्हणून, इंदिरांना गांधींनी जबाब दिला होता. तेव्हा प्रेसिडंड निक्सनला माफी मागावी लागली होती, अशी आठवण सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *