AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण, एका किलोमागे…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण, एका किलोमागे...
sugar jaggeryImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 8:35 AM
Share

पुणे : ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखर, गुळाचे दरात घसरण झाली आहे. गणेशोत्सवात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने परदेशातून तयार साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपयांनी घसरण झाली. तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांनी घट झाली आहे.

श्रावणातील पहिल्या पंधरवड्यात साखरेसाठी जादा पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळालाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखर आणि गूळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. जूनपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत होती. श्रावणातील सण-उत्सवांमुळे घरगुती ग्राहकांसह प्रक्रिया उद्योगांकडून साखरेची मागणी वाढली होती.

गेल्या हंगामातील कमी उत्पादन आणि पावसाला झालेल्या विलंबामुळे नवीन हंगामातील साखर उत्पादन उशिरा सुरू होण्याची शक्यता असल्याने दरवाढ झाली होती. साखरेपाठोपाठ गुळाचे दरही वाढले होते. मात्र, आता आयात साखरेला परवानगी मिळाल्याने बाजारातील उपलब्धता वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या काळात साखर आणि गुळाची मागणी वाढणार असतानाच दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

सरकारची नवीन कोटा पद्धत काय?

देशात व्यापाऱ्यांनी भाववाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मोठ्या प्रमाणात साठेबाजी आणि अतिरिक्त खरेदी झाल्याची शक्यता आहे. परंतु सरकारने देशात पुरासा साठा असल्याचे म्हटलं आहे. बाजारात साखरेचा साठा वाढवण्यासाठी सप्टेंबरपासून नवीन पद्धतीचा स्वीकार करणार आहे. सरकार मासिक कोटापद्धतीऐवजी 15 दिवसांची कोटा पद्धत लागू करणार आहे. या नियमानुसार, साखर कारखान्यांना निश्चित कोट्यापैकी 40 टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित साखर पुढील आठवड्यात विकावी लागणार आहे. यामुळे साखरेच्या साठेबाजीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या नियमामुळे साखरेची मागणी आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यास सोपे जाणार आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास सरकारकडून अतिरिक्त कोटा देखील जारी केला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल