आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये आज (28 जून) सकाळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा एक ट्रक 200 फुट दरीमध्ये कोसळला. या घटनेतील चालक आणि त्याच्या साथीराने ट्रकमधून उडी मारल्याने ते या अपघातातून बचावले आहेत.

आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 8:36 PM

रायगड : पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये आज (28 जून) सकाळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा एक ट्रक 200 फूट दरीमध्ये कोसळला. या घटनेत चालक आणि त्याच्या साथीदाराने ट्रकमधून उडी मारल्याने ते या अपघातातून बचावले आहेत. मात्र ट्रकमधील साखरेचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे.

चालक सचिन भिसे सकाळी सांगली कुंडळगाव येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याचा ट्रक घेऊन निघाला. ट्रक आंबेनळी घाटाच्या कुंभळवणे गावापुढील सरळ रस्त्याच्या प्रारंभीच्या वळणाजवळ आला असता, सचिनचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक दरीमध्ये कोसळला. यावेळी चालक सचिन भिसे आणि क्लिनर अमर मारूती पिसाळ यांनी ट्रक दरीत कोसळत असताना बाहेर उडी टाकत अपला जीव वाचविला. या ट्रकमध्ये 10 टन साखर आणि 1 टन उच्च प्रतीचा गुळ आहे. हा गुळ वेळेत दरीतून बाहेर काढला नाही, तर पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्यावर्षी या आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठाची बस कोसळली होती. या अपघातात तब्बल 33 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातात सुदैवाने एकजण बचावला होता. हे सर्वजण पिकनीकसाठी महाबळेश्वरच्या तापोळा रिसॉर्टला जात होते.

पावसाळ्यात या घाटात अनेक अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे येथे वाहने हळू आणि सावधतेने चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.