AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sujat Ambekdar : ऐन ‘पदवीधर’ निवडणुकीत नितेश कराळेंचा गेम कुणी केला? सुजात आंबेडकरांची भलीमोठी पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Sujat Ambekdar : शरद पवार गटाने नितेश कराळे यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. नितेश कराळे यांच्यावरील कारवाईवर सुजात आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sujat Ambekdar : ऐन 'पदवीधर' निवडणुकीत नितेश कराळेंचा गेम कुणी केला? सुजात आंबेडकरांची भलीमोठी पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
sujat ambekarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 1:03 PM
Share

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या काही तासांआधीच शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली. शरद पवार गटाने मास्तर नितेश कराळे यांची तब्बल सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. खरंतर कराळे यांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणं महागात पडलं आहे. त्यांच्यावर शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे नितेश कराळे यांच्या समर्थनात उभे राहिले आहेत. नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणत आंबेडकरांनी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

सुजात आंबेडकरांची पोस्ट जशीच्या तशी 

सुजात आंबेडकर म्हणाले, ‘नितेश कराळेंना न्याय मिळाला पाहिजे.  दोन प्रकारचे प्राध्यापक असतात. एक ते जे विद्यार्थ्यांच्या विरोधात भूमिका घेतात. विद्यार्थ्यांचे शोषण करतात. उदा. प्रा. पी. अप्पा राव (डॉ. रोहित वेमुला संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी), प्रा. डुल्ला (साहिल वाकोडे संस्थात्मक हत्येप्रकरणी आरोपी) दुसरे प्राध्यापक असतात आयआयटी मुंबईमधील प्रा. सूर्यकांता वाघमारे, प्रा. विठ्ठल कांगणे, प्रा. नितेश कराळे सारखे. जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी भूमिका घेतात आणि त्यांचे संरक्षण करतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कराळे मास्तर सारखा असेट गमावला आहे. सध्याच्या जेन झीच्या वातावरणात भूमिका घेणाऱ्या कराळे मास्तर सारख्या व्यक्तीचा फायदा घेता आला असता. मोठ्या साहेबांचा इतिहास राहिला आहे. वरती सेटलमेंट, खाली कार्यकर्त्यांचा बळी’.

‘एका महिन्यापूर्वी मी वर्धा येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने गेलो होतो. तेव्हाच कराळे मास्तरांना सांगितले होते की, हा पक्ष तुमचा गेम करेल. ते आज घडतांना दिसले.लखानी परिवारासाठी मोठे साहेब महाविकास आघाडीचा उमेदवार गायब करून बिनविरोध निवडणूक करू शकतात तर कराळे मास्तरसाठी का नाही? असा सवाल सुजात आंबेडकरांनी केला आहे. सुजात आंबेडकरांच्या मागणीवर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया मिळते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा