अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक, भरसभेत डोळे पाणावले, नेमकं काय घडलं?
बारामती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले.

दिवगंत अजित पवारांच्या निधनाला 8 महिने झाले आहेत. अजितदादांच्या निधनानंतरही बारामतीमधील कुटुंबाील सदस्य आणि कार्यकर्ते त्यांची आठवण काढत असतात. बारामती आणि अजितदादांचं एक वेगळं नातं होतं. शहरात त्यांच्या पुतळ्याचं देखील अनावरण झालं आहे. अजितदादा आठवड्यातून एक दिवस खास बारामतीच्या जनतेसाठी काढत होते. याच बारामतीत सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या बँकेच्या सभेत उपस्थितांशी बोलताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या आठवणीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामती सहकारी बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उपस्थितीत ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या भाषणाच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची आठवण काढली. त्यानंतर त्यांचे डोळे हजर राहायचे. त्यांनी बारामती सहकारी बँकेचे सभासद आणि अजितदादांची आठवण सांगितली. ‘आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादाना वंदन करते. नवरात्र. दसरा आणि दिवाळीच्या आजच शुभेच्छा देते. मला वाटलाच नव्हतं, मला अशा मला बैठका घ्याव्या लागतील. अजितदादांची सर कोणालाच येणार नाही. मला माफ करा मला माफ करा, असं म्हटल्यनंतर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले. बारामती आणि दादांचं नात एवढं होत की, दादांशिवाय गोष्ट अपूर्ण वाटते. गेल्या पाच वर्षामध्ये दादांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय काम केलं आहे’.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
