AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी महायुतीचे हित… अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीनंतर सुनील तटकरे यांचे मोठे विधान..

खासदार सुनिल तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीचे उमेदवार म्हणून ते आज अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले.

शेवटी महायुतीचे हित... अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीनंतर सुनील तटकरे यांचे मोठे विधान..
MP Sunil Tatkare
| Updated on: Jun 01, 2026 | 10:43 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली. सुनील तटकरे यांनी म्हटले की, महायुती म्हणून आम्ही या 17 जागा लढत आहोत. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी याबाबत निर्णय घेतला. भाजपा कोणत्या जागा लढवेल आम्ही कोणत्या जागा लढू, याबाबत काल घोषणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतील घटक म्हणून त्या जागा लढण्याचे ठरवले. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणून दाखल करत आहोत. याला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे आर्शिवाद आहेत. या विभागातील महायुतीचे नेते आहेत. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले यांचे पाठबळ आहे. सर्वच महायुतीचे आमदार आणि नेत्यांचे पाठबळ आहे.

महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याकरिता सर्वच प्रमुख मंडळी याठिकाणी आले आहेत. अनिकेत तटकरेंची सर्व दाैरे झाले आहेत. रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल याठिकाणचे प्रश्न त्याने उपस्थित राहून सातत्याने मांडले आहेत. आता मतदार संघ इतका मोठा असल्याने नियमितपणे संपर्क होईल असे नाही. त्यात काही सुधारणा असतील तर त्याच लक्ष घालण्याच्या सूचना माझ्याकडून दिल्या जातील.

राजकारणात डील वगैरे होत नाही. शेवटी राजकारणात सामुदायिक चर्चा होते आणि शेवटी महायुतीचे हित समोर आहे. राजकीय संघर्ष होत असतो हे खरे आहे. कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. मात्र, अजूनही या जागेकरिता रस्सीखेंच बघायला मिळत आहे. आज अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

रायगडमधून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीचे उमेदवार हा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता दाखल झाले आहेत. रायगडच्या या जागेकडे सर्वांच्या नजरा होत्या. गेल्या काही दिवसांपासून भरत गोगावले विरोधात  सुनील तटकरे असा सामना बघायला मिळत आहे. अजूनही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नाही. आदिती तटकरे आणि भरत गोगावले दोघेही पालकमंत्रिपदाकरिता आग्रही आहेत. मात्र, अजूनही तोडगा निघू शकला नाही.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात