AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडसाठी समर्थकाने पेटवून घेतले, अंगाला आग, पाय जळाला; पोलीस स्टेशनबाहेरच धक्कादायक प्रकार

मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आता परळीमधील आंदोलन चिरघळलं आहे, कार्यकर्त्यानं पेटून घेतलं आहे.

वाल्मिक कराडसाठी समर्थकाने पेटवून घेतले, अंगाला आग, पाय जळाला; पोलीस स्टेशनबाहेरच धक्कादायक प्रकार
| Updated on: Jan 14, 2025 | 8:39 PM
Share

वाल्मिक कराड समर्थक परळीत अधिकच आक्रमक झाले आहेत. दिवसभरात तीन जणांनी अंगावर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण नागरिकांनी त्यांना वाचवलं. पण आज रात्री वाल्मिक कराड याच्या एका समर्थकाने तर अंगाला आग लावून घेतली. या आगीत त्याचे पाय जळाले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याबाहेरच हा प्रकार घडला. त्यामुळे एकच वातावरण तापलं आहे. कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले असून जोरदार घोषणा देत आहेत.

वाल्मिक कराडच्या समर्थकांचं आज सकाळपासूनच आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी एका कार्यकर्त्याला भोवळ आल्याचा प्रकार देखील घडला. दरम्यान वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये त्याची आई देखील सहभागी झाली आहे. मात्र त्यांची देखील प्रकृती खालावली आहे. सकाळपासून तीन जणांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान जेव्हा वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, त्यानंतर कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. परळीमध्ये  बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. टायर जाळून निषेध करण्यात आला. तसेच एका बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता हे आंदोलन अधिकच चिरघळलं आहे.  एका कार्यकर्त्यानं चक्क पेटून घेतलं. या घटनेत तो जखमी झाला आहे, त्याच्या पायाला इजा झाली आहे, आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

आज वाल्मिक कराड याची सीआयडी कोठडी संपत असल्यानं त्याला सकाळी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं, पुन्हा एकदा त्याच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली, मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळली, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्याचदरम्यान त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.  वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याचा ताबा मिळावा यासाठी एसआयटीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून एसआयटीला वाल्मिक कराडला ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल