AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विशाखा राऊत यांना मोठा दिलासा, नगरसेवकाच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! विशाखा राऊत यांना मोठा दिलासा, नगरसेवकाच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! विशाखा राऊत यांना मोठा दिलासा, नगरसेवकाच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
vishakha rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 2:35 PM
Share

प्रमोद जगताप, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली प्रतिनिधी : मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. महापौर रितू तावडे यांनी तसा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, आता याच निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांना मोठा दिलासा दिला आहे. विशाखा राऊत यांचे रिक्त झालेले नगरसेवक पद सध्या रिक्तच ठेवावे असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच शिंदे गटातील प्रिया सरवणकर यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे ठाकरे गटाला तसेच विशाखा राऊत यांना दिलासा असल्याचे मानले जातेय.

विशाखा राऊत यांचे नगरेवक पद रद्द का झाले होते?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विशाखा राऊत यांनी ठाकरे यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या विजयाला आव्हान दिले होते. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे नगरसेवक पदाची निवडणूकही लढवता येणार नव्हती. सरकारच्या नगरविकास विभागाकडून तशी अधिसूचना काढण्यात आली होती. नंतर रितू तावडे यांनीदेखील 7 सुप्टेंबर रोजी विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर विशाखा राऊत यांनी या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचे जाहीर केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विशाखा राऊत यांनी नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर आता राऊत यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाचीही नियुक्ती करू नये. ती जागा सध्यातरी रिक्तच ठेवावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात निवडणूक आयोग तसेच विशाखा राऊत यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया सरवणकर यांनाही नोटीस जारी केलीय. त्यांना या प्रकरणात त्यांची बाजू मांडावी असे निर्देश दिले आहेत.

Follow Us
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...