AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्…; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट

राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंनी अजितदादांसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. सुळे यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

Supriya Sule : अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन्...; राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट
supriya sule news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:27 AM
Share

राखी पौर्णिमा हा बंधुत्वाचा सण आहे. देशातील विविध भागात राखी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. सेलिब्रिटींपासून राजकीय नेते मंडळी देखील राखी पौर्णिमेचा सण आवडीने साजरा करतात. महाराष्ट्रातील पवार कुटुंबीयांच्या राखी पौर्णिमेच्या सणाकडे सर्वांचं विशेष लक्ष असायचं. परंतु सात महिन्यांपूर्वी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतरही अनेक नेते, कार्यकर्ते अजितदादांच्या आठवणी सांगत असतात. आजच्या राखी पौर्णिमेच्या सणालाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजितदादांसाठी खास पोस्ट लिहिली.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, प्रिय दादा… आज राखीपौर्णिमा… पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं… यावर आजही विश्वास बसत नाही. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे’.

सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं की, ‘रक्षाबंधना दिवशीची खूप भावनिक पोस्ट. फोटो पाहून गलबलायला होतंय’. तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, ‘ ताई तुमची आणि दादांची भावाबहिणीची जोडी एक वात्सल्याच प्रेमाचं आदर्श प्रतीक होतं. ताई दादांनी सर्वांना भरभरुन प्रेम दिले. आजही दादा गेलेत असे वाटतच नाही. दादांना शोधण्यासाठी मन भिरभिरतं. असे दादा पुन्हा होणेच नाही. दादा माझी राखी देखील तुमची वाट पाहते आहे’.

सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘महाराष्ट्रातल्या लेकिबाळींचा आत्मसन्मान राखण्यासाठी भाऊ म्हणून आपण आम्हाला कायम हवे आहात. सतत हसत रहा.. तणावमुक्त राहा.. आपलं हसतमुख असणं हाच हा विरोधकांसाठी जालीम उपाय आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा’.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप