AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ दिल्लीत आले असते तर… सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या शरद पवार यांचा…

राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटली नाही तर फोडली, असा आरोप करत सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या दिल्लीतील नेतृत्वाचे समर्थन केले. दरम्यान, भुजबळांच्या नकारानंतर अजित पवार गटाने राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

छगन भुजबळ दिल्लीत आले असते तर... सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या शरद पवार यांचा...
supriya sule chhagan bhujbal
| Updated on: Jun 08, 2026 | 12:02 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या हायव्होल्टेज ड्रामावर अखेर पडदा पडला आहे. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी भुजबळांनी या उमेदवारीला नकार दिल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संपूर्ण घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटाला टोला लगावला.

अजित पवार गटात मंत्रिपदावरून आणि उमेदवारीवरून सुरू असलेल्या या अंतर्गत गोंधळावर सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांबद्दल भाष्य केले. छगन भुजबळ यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. त्यांनी पक्षासाठी मोठे त्याग आणि कष्ट केले असून ते नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्या सुख-दुःखात सोबत राहिले आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आणि ऋण राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

छगन भुजबळ यांनी दिल्लीत यावे आणि देशपातळीवर नेतृत्व करावे, असा स्वतः शरद पवार यांचा नेहमीच आग्रह होता. जर ते दिल्लीत आले असते, तर देशाला एक मोठे आणि खंबीर नेतृत्व मिळाले असते. एवढेच नाही तर आमच्यासारख्या सर्वच नवीन खासदारांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले असते. त्यांच्या घरात किंवा पक्षात काय चालले आहे, याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नसून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.

छगन भुजबळांची ती अट अमान्य

दरम्यान छगन भुजबळ यांना दिल्लीत राज्यसभेवर पाठवण्यासाठी अजित पवार गटाची तयारी होती. जर भुजबळ दिल्लीत गेले, तर त्यांच्या नाशिकमधील येवला मतदारसंघातून त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना विधानसभा पोटनिवडणुकीत उतरवण्याची रणनिती भुजबळांनी आखली होती. यासाठी छगन भुजबळ यांनी पक्षासमोर आणि महायुतीसमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. मी राज्यसभेवर जाण्यास तयार आहे, मात्र त्या बदल्यात समीर भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात यावा, अशी अट छगन भुजबळांनी घातली होती.

या मागणीसाठी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची भेट घेतली. मात्र, भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून आणि महायुतीतील नेत्यांकडून ही अट फेटाळण्यात आली. तसेच पक्षातील इतर आमदारांनीही या घराणेशाहीच्या मागणीला छुपा विरोध दर्शवल्याचे बोललं जात आहे. यानंतर छगन भुजबळांनी अखेर दिल्लीत जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि मी महाराष्ट्रातच राहून ओबीसी चळवळीचे काम करेन, अशी भूमिका घेतली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली