Supriya Sule : शिक्षक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जो निर्णय होईल तो..सुप्रिया सुळे यांचं महत्वाचं वक्तव्य
Supriya Sule : पार्थ पवारांवर आरोप असलेल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे प्रकरण न्यायालयात आहे आणि याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारला पाहिजे.

मुंबईत आज दुपारी कॉकरोच जनता पार्टीच आंदोलन होणार आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडलं. “सीजेपीचं जंतरमंतरवरील आंदोलन पाहिलं. जंतर-मंतरवर काय झाले हे सगळं भाजपला माहिती आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होतंय त्याबाबत सरकारने विचार केला पाहिजे. शांततेत आणि संविधान चौकटीत आंदोलन करण्याचा अधिकार त्या लोकांना आहे. निवडणूक आयोगाचं जे वागणं आहे, आरोप-प्रत्यारोप आहेत हे लोकशाही मोडीत काढण्याचं पाप सर्वसामान्य जनता पाहत आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी मुंबईत होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. “मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील गावातला डेली आढावा घेत असते” असं सुळे यांनी सांगितलं.
पार्थ पवारांवर आरोप असलेल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हे प्रकरण न्यायालयात आहे आणि याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. मला विचारण्याऐवजी राज्य सरकारला विचारलं पाहिजे” “सरकारला अजून अर्धा दिवसाचा वेळ दिला पाहिजे आणि ज्या मागण्या करतो त्या फिल्डवरच्या करत आहोत, रोजगार हमी काम सुरू झालं पाहिजे. मदत झाली पाहिजे. तातडीने हे होणं गरजेचं आहे. पाणी नियोजन असेल टँकर असेल हे सगळं सुरू झालं पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्याची अंमलबजावणी करावी
“महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वोट चोरी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. पवार साहेबांनी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. त्याची अंमलबजावणी करावी” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “जो निर्णय शिक्षक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी जो निर्णय होईल तो महाविकास आघाडी म्हणून होईल त्याबाबत काल बैठक झाली आहे” असं सुप्रिया सुळे बोलल्या.
