जिल्हाध्यक्षासह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, नांदेडमध्ये स्वाभिमानीचं अस्तित्व धोक्यात

नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदेडमध्ये काँग्रेसशी फारकत घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. भाऊराव चव्हाण या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे शंभर कोटी रुपये सहा वर्षांपासून थकले आहेत. शेतकऱ्यांचे हे पैसे मिळावेत यासाठी स्वाभिमानी संघटनेने लोकचळवळ उभारली. मात्र कारखान्याने ही थकीत रक्कम दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानीने नांदेडमध्ये काँग्रेसचा …

जिल्हाध्यक्षासह 22 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, नांदेडमध्ये स्वाभिमानीचं अस्तित्व धोक्यात

नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदेडमध्ये काँग्रेसशी फारकत घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार असलेल्या अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. भाऊराव चव्हाण या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे शंभर कोटी रुपये सहा वर्षांपासून थकले आहेत. शेतकऱ्यांचे हे पैसे मिळावेत यासाठी स्वाभिमानी संघटनेने लोकचळवळ उभारली. मात्र कारखान्याने ही थकीत रक्कम दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानीने नांदेडमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

राज्य पातळीवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काँग्रेससोबत आघाडी आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांसोबत ही आघाडी राहिली नाही. राज्यात काँग्रेसशी आघाडी असल्यामुळे स्वाभिमानीला काही अडचण येऊ नये म्हणून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्यासह 22 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला.

नांदेडमध्ये स्वाभिमानी संघटनेचं अस्तित्व टिकवण्यात प्रल्हाद इंगोलेंचा मोठा हातभार होता. आता इंगोलेंसह त्याच्या समर्थकांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमानीचं नांदेडमधलं अस्तित्व धोक्यात आलंय. साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांनी शेतकऱ्यांचे आम्ही कोणतेही पैसे थकवले नाही, काही थकबाकी असली तर ती देऊ अशी प्रतिक्रिया फोनवरून दिली.

नांदेडमधला नेमका वाद काय?

अशोक चव्हाण मुख्य प्रवर्तक असलेला भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना येहळेगाव इथे आहे. या सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे जवळपास शंभर कोटी रुपयांचे देणे थकवले आहेत. एफआरपीसह विविध प्रकारचं देणं भाऊराव चव्हाण साखर कारखान्याकडे थकलं आहे. शेतकऱ्यांचे हे पैसे मिळावेत यासाठी स्वाभिमानीचे इंगोले यांनी लोकवर्गणी गोळा करत उच्च न्यायालयात धाव घेतली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वर्गणी दिल्यामुळे हा लढा आता न्यायालयात सुरू आहे. असं असताना काँग्रेसचा प्रचार करणं शक्य नाही, अशी भूमिका घेत इंगोले यांनी पक्ष सोडला. पश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेडमध्ये रुजत होती. त्याला शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी पाठिंबा मिळत होता. आता मात्र या संघटनेचं नांदेडमध्ये पुढे काय होईल असा प्रश्न आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *