AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : भारत इंग्लंड सामन्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच विधिमंडळात वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मनमानी कारभाराबद्दल आज विधान परिषदेत आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. भारत इंग्लंड सामन्याच्या तिकीटांबद्दल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी आमदार चांगलेच आक्रमक झाले.

T20 World Cup : भारत इंग्लंड सामन्याला अवघे काही तास शिल्लक असतानाच विधिमंडळात वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?
Legislative CouncilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 05, 2026 | 4:50 PM
Share

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मनमानी कारभाराबद्दल आज विधान परिषदेत आमदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. भारत इंग्लंड सामन्याच्या तिकीटांबद्दल विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आला, यावेळी आमदार चांगलेच आक्रमक झाले. सनदी अधिकाऱ्यांना पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नसल्याची खंत यावेळी आमदारांनी बोलून दाखवली. दरम्यान दुसरीकडे  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरु असलेल्या तिकीटीच्या कारभाराबद्दल सभापती राम शिंदे यांची देखील नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान भारत इंग्लंड सामना आज मुंबईत होत आहे, त्याचं कौतुक आहे.  शरद पवार  BCCI चे अध्यक्ष असताना आणि अधिवेशन सुरू असताना सदस्यांना पासेस दिले जायचे.  पंरतु आता मोठ-मोठ्या कंपन्यातील लोक सुद्ध तिथे जाऊन बसतात, परंतु अधिवेशन सुरू असताना आमदारांना जायचं असेल तर पास मिळत नाहीत.  सनदी अधिकाऱ्यांना पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नाहीत. तिकीट मिळवायचं असेल तर अनेकांना मस्का लावावा लागतो, तेव्हा तिकीट मिळतं, असं यावेळ प्रतिक्रिया देताना आमदार सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.  तर दुसरीकडे  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सामना असल्यावर आम्ही तिकीट देतो, तसेच यांनीही पासेस द्यावेत.  अधिवेशन सुरु असताना सदस्यांना सामन्यासाठी जाण्यासाठी व्यवस्था असावी, अशी मागणी यावर मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

दरम्यान यावर बोलताना सभापती राम शिंदे यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. सचिन अहिर यांनी मांडलेली परिस्थिती अतिशय केविलवानी आहे. क्रीडामंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत.  आमदारांसाठी पासेसची व्यवस्था करायला हवी असं, असं यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी म्हटलं आहे. तर अनिब परब यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला फुकट देऊ नका, आमच्याकडून पैसे घ्या तुमचं आम्हाला फुकट काहीच नको, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.  तर याला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रीडा विभागाची बाजू मांडली आहे.  क्रीडा विभागाला पासेस दिले जात नाहीत. भविष्यात अधिवेशन काळात सामने असतील तर पासेस उपलब्ध करून द्यायची तरतूद करू, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!