माझगावच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांच्यावर चाचण्या, काय आहे अपडेट?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री त्यांना माझगावच्या कॅन्सर रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या चाचणी करण्यात आल्या आहेत.

माझगावच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शरद पवार यांच्यावर चाचण्या, काय आहे अपडेट?
sharad pawar news
| Updated on: Nov 27, 2026 | 9:39 PM

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून माझगावच्या कॅन्सर रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे शरद पवार यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुन्हा शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना आज ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच महिन्यात तिसऱ्यांदा शरद पवार यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. कालच शरद पवार यांची राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली होती.

Loading...

शरद पवार यांना शुक्रवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयातून माझगाव येथील कॅन्सर रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे शरद पवार यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या.त्यानंतर शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा देणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सायंकाळी टीव्ही वाहिन्यांवर केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर सारवासारव केली. बिलाचा मसुदा पाहिल्यानंतर आम्ही या बिलाला पाठींबा द्यायचा की नाही ते सांगू असा पवित्रा सुप्रिया यांनी अखेर घेतला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us