“कसबा पोटनिवडणुकीत भाजपनं पैशाचा पाऊस पाडला”; ठाकरे गटाने भाजपवर गंभीर आरोप केले…

कसबो पोटनिवडणुकातील विजयामुळे आता लोकांचा ट्रेंड बदलला आहे, हेच या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपची धुळदाण उडवण्यात आल्याने भाजपला हा पराभव जिव्हारी लागला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपनं पैशाचा पाऊस पाडला; ठाकरे गटाने भाजपवर गंभीर आरोप केले...
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:58 PM

अकोलाः कसबा पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारल्यानंतर महाविकास आघाडीसाठी वेगळे बळ मिळाले आहे. त्यामुळे आता पुण्यासह राज्यभर या पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुकीबद्दल बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळावरच हल्लाबोल केला आहे. कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळाने कसबा पोटनिवडणुकीत ठिय्या मांडला होता अशी टीकाही सुषमा अंधारे यानी शिवसेना आणि भाजपवर केली आहे.

कसबा पोटनिवडणूक ही भाजपसाठी महत्वाची होती कारण, भाजपसाठी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी बालेकिल्ला होता. त्यामुळेच अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ कसबा पोटनिवडणुकीसाठी ठाण मांडून बसले होते.

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून आता जनमत आणि त्यांचा कौल कोणत्या बाजूला वळला आहे हे सिद्ध होणारे आहे अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली.

या निवडणुकीवरून आता एका गोष्ट सिद्ध झाल्याचेही सुषमा अंधारे यांनी सांगितले. ही निवडणूक भाजपला तोपर्यंतच शक्य होती, जोपर्यंत भाजपसोबत शिवसेना होती.

या पोटनिवडणुकीत भाजपसोबत शिवसेना नसल्याने त्यांना आता येथे पहिला फटका बसला असल्याचेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.

कसबा पोटनिवडणुकीमुळे आता लोकांचा ट्रेंड बदलत आहे, आणि लोकांना आता समजले आहे की, अच्छे दिन आनेवाले नहीं है हे मतदारांना आता पक्कं माहिती झाले आहे असा टोला त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला आहे.

या निवडणुकीपासून आता महाविकास आघाडीचा ट्रेंड सुरु झाला आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याचा गहजब केला जातो आहे.

मात्र ज्यावेळी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकादा प्रस्ताव का मांडला नाही असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.