AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushma Andhare | ‘देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS’, सुष्मा अंधारे यांनी वापरले अत्यंत टोचणारे शब्द

Sushma Andhare | संजय शिरसाट, बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांच एकच क्वालीफिकेशन 'उर्मटपणा'. ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत" अशी टीका सुष्मा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare | 'देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS', सुष्मा अंधारे यांनी वापरले अत्यंत टोचणारे शब्द
Sushma Andhare-devendra fadnavis
| Edited By: | Updated on: Aug 10, 2023 | 2:20 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या नेहमीच आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असतात. खासकरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या नेहमीच बोचरी टीका करतात. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस आहेत. ते RSS चे कळसूत्री बाहुली आहेत. त्यांना गोळकवलकारांना महापुरुषांच्या यादीत आणून बसवायचं आहे” असं सुष्मा अंधारे म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटलं, तेव्हा भाजपाचे बावनकुळे, शेलार, लाड तुटून पडायचे. आता महापुरुषांचा अपमान होताना कुठं आहेत?” असा सवाल अंधारे यांनी केला.

‘अजित पवार आता कौतुक करतात’

“मुख्यमंत्र्यांनी अमित शाहंच कौतुक करणं म्हणजे, उंदराला मांजर साक्षी असं आहे. हेच मुख्यमंत्री भाजपसोबत राहू शकत नाही म्हणायचे, हेच अजित पवार एक एक उद्योग बाहेर गेला म्हणून टिका करायचे, तेच अजित पवार आता कौतुक करतात” असं सुष्मा अंधारे म्हणाल्या.

‘श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का?’

“मग हेच लोक आधीचे लोक खरे की आताचे खरे हा प्रश्न पडतो?. श्रीकांत शिंदे ,भाजपा आक्रस्ताळेपणा करते. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का?. मलाही हनुमान चालीसा येते” असं अंधारे म्हणाल्या. “शिरसाट, बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांच एकच क्वालीफिकेशन आहे उर्मटपणा. ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत” अशी टीका त्यांनी केली. स्मृती इराणी आता धमक दाखवणार का?

“स्मृती इराणी सोयीस्कर राजकारण करतात. ज्या स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगांना निर्भया प्रकरणावरून साडीचोळीचा आहेर पाठवला, त्याच इराणी आता मणिपूरवरून आहेर पाठवणार का ? धमक दाखवणार का ? त्यांना प्रसिद्धी हवी असते म्हणून सोयीस्कर बोलत असतात” अशी टीका अंधारे यांनी केली.

Follow Us
ठाकरे सेनेला मुंबईत धक्का! विशाखा राऊतांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास