AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं?

ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका अग्निशमन जवानासह पालिकेच्या सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

पहाटेची वेळ, अचानक धुराचे लोट उठले अन् एका क्षणात.. ठाण्यात अग्नितांडव, 2 जण कचाट्यात; नेमकं काय घडलं?
thane fire
| Updated on: May 21, 2026 | 8:19 AM
Share

ठाणे रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज (२१ मे) पहाटे भीषण आग लागली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाले. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात अग्निशमन दलाचे एक जवान आणि रात्रपाळीवर असणाऱ्या एका सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.

कापड, प्लास्टिकमुळे आग भडकली

मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी गजबजलेले असणारे गावदेवी भाजी मार्केट पहाटेच्या वेळी शांत होते. मात्र, पहाटे ४ च्या सुमारास अचानक मार्केटमधून धुराचे लोट निघू लागले. त्यानंतर पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकाने आणि विविध साहित्याची गोडाऊन आहेत. कापड, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

या आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान ५ अग्निशमन गाड्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि धुराचे प्रचंड साम्राज्य यामुळे सुरुवातीला आग विझवण्यात मोठे अडथळे येत होते. तरीही जवानांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असलेले अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे (४३) आणि रात्रपाळीवर असणारे सुरक्षारक्षक काळू गाडेकर (५३) आगीच्या कचाट्यात सापडले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे मार्केटमध्ये लोकांची गर्दी नव्हती. ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट

मात्र या भीषण आगीत कपड्यांची दुकाने आणि गोडाऊन जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन भाजी मार्केटमध्ये लागलेल्या या आगीमुळे परिसरातील वाहतुकीवर तसेच सकाळच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ