संतापजनक! मासे विकताना परप्रांतीयाने पँन्टमध्येच केली लघुशंका, धक्कादायक प्रकार समोर येताच…

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका मासेविक्रेत्याने पँन्टमध्येच लघुशंका करून तिथेच माशांची विक्री केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय.

संतापजनक! मासे विकताना परप्रांतीयाने पँन्टमध्येच केली लघुशंका, धक्कादायक प्रकार समोर येताच...
thane fish seller
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 24, 2026 | 2:52 PM

ठाणे : परप्रांतीय मासेविक्रेत्याने केलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने मासेविक्री करताना पँन्टमध्येच लघुशंका केली आहे. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी उघडकीस आणला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र चीड व्यक्त केली जात आहे. हा प्रकार गंभीर असून अतिक्रमणविरोधी पथकाने अशा प्रकारे रस्त्यावर मेसेविक्री करणाऱ्यांविरोधात कठोर करवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील चंदनवाडी येथे हा प्रकार घडला आहे. या भागात एक परप्रांतीय व्यक्ती रस्त्यावर मासेविक्री करत होती. या मासेविक्रेत्याने पँन्टमध्येच लघुशंका केली होती. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच या मासेविक्रेत्याला टोकले. त्याला जागेवरच उभे करून घडलेला सर्व प्रकार कॅमेऱ्यासमोर सांगितला. त्याने पँन्टमध्येच लघुशंका केल्याने कदम यांनी संताप व्यक्त केला आहे.

…तर आयुक्तांच्या दालनात मासे फेकून निषेध खरू

विशेष म्हणजे पँन्टमध्ये लघुशंका केलेली असताना हा मासेविक्रेता तशाच स्थितीत मासे विकत होता. ही घटना उजेडात आल्यानंतर आता परवानगी नसताना तसेच अतिक्रमण करून माशांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच वेळीच अशा लोकांविरोधात कारवाई न केल्यास आम्ही पालिका आयुक्तांच्या दालनात मासे फेकून निषेध व्यक्त करू, असा इशाराही महेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

मासेविक्रेत्यावर कारवाई होणार का?

दरम्यान, कोणतेही खाद्यपदार्थ विकताना ते स्वच्छ असावेत. यासह खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाण स्वच्छ असावे, स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करूनच अशा प्रकारचा व्यवसाय करावा, असा नियम आहे. परंतु अनेकजण या नियमांचे पालन करत नाही. मुंबई, ठाण्यासारख्या भागात अतिक्रमण करून जमेल त्या ठिकाणी लोक आपला व्यवसाय थाटत आहेत. यात फेरीवाल्यांचीही भर आहे. त्यामुळे सामान्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच भविष्यात आरोग्याचेही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या मासेविक्रेत्याविरोधात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.