Ulhanagar Municipality : उल्हासनगर पालिकेत ओबीसींना 24 जागा, आरक्षण सोडतीनंतर अनेकांची कोंडी

उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग असून त्यातील एक प्रभाग द्विसदस्य तर उर्वरित 29 प्रभाग त्रिसदस्य असलेले आहेत. यापैकी 45 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.

Ulhanagar Municipality : उल्हासनगर पालिकेत ओबीसींना 24 जागा, आरक्षण सोडतीनंतर अनेकांची कोंडी
उल्हासनगर पालिकेत ओबीसींना 24 जागा, आरक्षण सोडतीनंतर अनेकांची कोंडीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:48 PM

उल्हासनगर : सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत ओबीसी (OBC) सदस्यांसाठी आरक्षण (Reservation) सोडत पार पडली. यात ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित करण्यात आल्या. एकूण 89 सदस्य संख्या असलेल्या उल्हासनगर महापालिकेत 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं असून, या आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिके (Ulhasnagar Municipality)ला यात 27 ओबीसी टक्के आरक्षण मिळालं. त्यानुसार शुक्रवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजिज शेख आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण सोडत पार पडली. यावेळी शासनाच्या नियमानुसार काही जागा ओबीसींसाठी निश्चित करण्यात आल्या. तर उर्वरित जागांसाठी सोडत पूर्ण झाली.

30 पैकी एक प्रभाग द्विसदस्यीय तर 29 त्रिसदस्यीय

उल्हासनगर शहरात एकूण 89 जागांपैकी 24 जागा ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आल्या. यात 12 जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 30 प्रभाग असून त्यातील एक प्रभाग द्विसदस्य तर उर्वरित 29 प्रभाग त्रिसदस्य असलेले आहेत. यापैकी 45 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी असलेली एकमेव जागा महिलांसाठी आरक्षित आहे. तर अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित असून त्यापैकी आठ जागा महिलांसाठी आहेत. ओबीसीसाठी 24 जागा असून त्यापैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49 जागा आहेत.

शिवसेनेच्या मोठ्या नगरसेवकांनाही ओबीसी आरक्षणाचा फटका

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत जाहीर झालेल्या ओबीसी आरक्षणात अनेकांना धक्का बसला. प्रभाग क्रमांक 6 आणि 28 या दोन प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व तीन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये इच्छुक असलेल्या पुरुष मंडळींना मोठा धक्का बसला आहे. यात प्रभाग क्रमांक सहा आमदार कुमार आयलानी यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर प्रभाग क्रमांक 28 हा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर वनवारी यांचा प्रभाग आहे. शिवसेनेच्या काही मोठ्या नगरसेवकांना या ओबीसी आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी सुरक्षित प्रभागाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. (24 seats for OBCs in Ulhasnagar Municipality after Supreme Court order)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.