AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई

पोलिसांनी अवघ्या दोन तासात या चोरट्याला कल्याणमधील बैलबाजार परिसरातून अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू व चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले, रेल्वे पोलिसांची कारवाई
कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडलेImage Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 5:20 PM
Share

कल्याण : चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाईल (Mobile) लुबाडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरून शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासात कल्याण बैलबाजार परिसरातून अटक (Arrest) केली आहे. मोनू चाळके असे या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (At the Kalyan railway station a passenger was robbed at gunpoint)

रेल्वे पोलिसांनी दोन तासात चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात 1 नंम्बर फलाटापासून काही अंतरावर रुळावरून एक प्रवाशी काल पहाटेच्या सुमारास घरी परतत होता. अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरटा या ठिकाणी दबा धरून बसला होता. या चोरट्याने प्रवाशाला पकडलं. त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून चोरट्याने तिथून पळ काढला. याप्रकरणी प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रवाशाने या चोरट्याचे वर्णन पोलिसांना सांगितले. या वर्णनाच्या आधारे रेल्वे पोलिसांच्या पथकाने या चोरट्याचा शोध सुरू केला.

पोलिसांनी अवघ्या दोन तासात या चोरट्याला कल्याणमधील बैलबाजार परिसरातून अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू व चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

येवल्यात चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

येवला शहरातील कांदा मार्केट समोर असणाऱ्या प्रभू इंटरप्राईजेस,संतोष ट्रेडिंग कंपनी तसेच ओम वैष्णवी एंटरप्राइजेस ही तिन्ही दुकाने लुटल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास दुकानाचा वरील बाजूचा पत्रा वाकवून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करत चोरी केल्याची घटना घडली असून चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (At the Kalyan railway station a passenger was robbed at gunpoint)

इतर बातम्या

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार

Ambernath Youth Death : अंबरनाथमध्ये ‘बटन’ गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.