AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार

Kalyan Police beaten : लोकलच्या महिला डब्यासमोर (Mumbai Local ladies bogy) उभं राहून हा फेरीवाला शिविगाळ करत होता. त्यामुळे पोलिसाने या फेरीवाल्याला हटकलं होतं. दरम्यान, या फेरीवाल्यानं थेट पोलिसालाच मारहाण करण्याला सुरुवात केली.

मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, आंबिवली स्थानकातील धक्कादायक प्रकार
पोलिसाला मारहाण करणाऱ्याला अटकImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 4:25 PM
Share

कल्याण : आंबिवली स्थानकात (Ambiwali Railway Station) एका पोलिस कर्मचाऱ्याला फेरीवाल्यानं (Police employee beaten) मारहाण केली आहे. या मारहाणी पोलीस कर्मचारी जखमी झालाय. आंबिवली स्थानकात एका पोलीसानं फेरीवाल्याला हटकलं होतं. हा फेरीवाला मद्यधुंद अवस्थेत होता. मद्यधुंद अवस्थेत लोकलच्या महिला डब्यासमोर (Mumbai Local ladies bogy) उभं राहून हा फेरीवाला शिविगाळ करत होता. त्यामुळे पोलिसाने या फेरीवाल्याला हटकलं होतं. दरम्यान, या फेरीवाल्यानं थेट पोलिसालाच मारहाण करण्याला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या आरोपीचं नाव गौतम कांबळे असं आहे. कल्याण जीआरपीनं गौतम कांबळेला बेड्या ठोकल्या आहेत. आता त्याच्यावर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

कधीची घटना?

मंगळवारी (29 मार्च) रोजी आंबिवली स्थानकात ही घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास मारहाणीचा हा प्रकार घडला. आंबिवली रेल्वे स्थानका पोलीस कर्मचारी रोहित जाधव हे कर्तव्य बजावत होते. फलाटावर हस्त घालत असताना त्यांची नजर एका फेरीवाल्यावर गेली. हा फेरीवाला आक्षेपार्ह भाषेत महिलांच्या डब्यासमोर उभा राहून बोलत होता.

नेमका प्रसंग काय घडला?

महिलांच्या डब्यासमोर शिव्या घालण्याच्या या मद्यधुंद फेरीवाल्याला पोलीस कर्मचारी रोहित जाधव यांना हटकलं. लोकलच्या महिला डब्यासमोर उभा राहून गौतम कांबळे हा तरुण जोरदोर शिव्या देत होता. सुरुवातीला रोहित यांनी गौतमला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुच्या नशेत असलेल्या गौतमनं पोलिस कर्मचारी रोहित यांचं जराही ऐकलं. उलट अधिकच जोरजोरात शिव्या देण्यास सुरुवात केली. यानंतर गौतमला रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी रोहित यांनी गौतमला हटकलं. दरम्यान, नशेत असलेल्या गौतम यांनं पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी रोहित जाधव हे जखमी झाले.

अधिक चौकशी सुरु

यानंतर कल्याणच्या जीआरपी पोलिसांनी गौतम कांबळेविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली . गौतम कांबळे हा फेरीवाला असून ते ठाणे स्थानकासह इतर स्थानकात फेरीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सध्या पोलीस गौतम यांची अधिक चौकशी करत आहेत.. दरम्यान, पोलिसांवर हात उचलण्याच्या या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या :

Nanded | तपोवन एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास, तरुणाची आत्महत्या, नांदेड स्थानकावर धक्कादायक घटना

औरंगाबादेत कुरिअरने आला शस्त्रसाठा, तब्बल 37 तलवारी, एक कुकरी जप्त, पोलिसांचा तपास सुरू

सेप्टिक टँक साफ करताना गुदमरुन दोघांचा मृत्यू, ठाण्यात एका आठवड्यातील दुसरी घटना

पाहा Video महत्त्वाची बातमी : प्रवीण दरेकरांच्या अटकेसाठी आंदोलन

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.