AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | बदलापूरच्या रासायनिक कंपनीत गॅस गळती, कारण काय?

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. (Badlapur Chemical Factory Gas Leak)

VIDEO | बदलापूरच्या रासायनिक कंपनीत गॅस गळती, कारण काय?
gas-leak
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 7:10 AM
Share

बदलापूर : बदलापूरच्या (Badlapur) एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत (Chemical Factory) रासायनिक गॅसगळती (Gas Leak) झाल्याची घटना समोर आली आहे. रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. (Badlapur Chemical Factory Gas Leak)

दोन तासांनी परिस्थितीवर नियंत्रण

बदलापूरच्या एमआयडीसीत काल (4 जून) रात्री जवळपास 10.22 मिनिटांनी रासायनिक कंपनीत गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसेच या घटनेनंतर परिसरात मोठी घबराट पसरली. जवळपास दोन तासांनी म्हणजे रात्री 11.24 मिनिटांनी अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

बदलापूर एमआयडीसीत नोबेल इंटरमिडीएट्स नावाची रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतील रिऍक्टरमध्ये काल रात्री ही गॅस गळती झाली. या रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक अॅसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केलं जात होतं. मात्र त्यावेळी यात सल्फ्युरिक अॅसिड जास्त पडल्याने अचानक रिऍक्टरमधून गॅस लीक झाला. त्यानंतर काही क्षणातच हा गॅस आजूबाजूच्या परिसरात पसरला.

परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणं, डोळे जळजळणं असे त्रास होऊ लागले. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ही गळती रोखण्यात आली. त्याशिवाय रिऍक्टरचं कुलिंग ऑपरेशन केलं. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ 

(Badlapur Chemical Factory Gas Leak)

संबंधित बातम्या : 

Oxygen Plant Leak | सांगलीमध्ये ऑक्सिजन प्लांटला गळती, जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट

Weather Alert: मान्सूनचा पाऊस वेशीवर दाखल; कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...