VIDEO | केंद्रीय राज्यमंत्र्यांचं भिवंडीत क्रिकेट, दानवेंची फलंदाजी, कपिल पाटलांनी कशी काढली विकेट?

भिवंडीत रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. रावसाहेब दानवेंसाठी फटकेबाजी नवीन नाही. राजकीय मैदानात ते आपल्या बोलण्याने समोरच्याला गार करतात. एकामागून एक तुफान किश्श्यांची फटकेबाजी ते नेहमी करत असतातच, पण दाजींना क्रिकेट खेळताना पाहण्याचीही त्यांच्या समर्थकांना सवय आहे

VIDEO | केंद्रीय राज्यमंत्र्यांचं भिवंडीत क्रिकेट, दानवेंची फलंदाजी, कपिल पाटलांनी कशी काढली विकेट?
| Updated on: Mar 04, 2022 | 8:03 AM

भिवंडी : मोदी सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे दोन मराठमोळे खासदार ठाणे जिल्ह्यात क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमी ‘बोलं’दाजी करताना पाहायला मिळतात, मात्र यावेळी त्यांनी तुफान फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं. तर दाजी अर्थात दानवेंची विकेट काढण्यासाठी भिवंडीचे भाजप खासदार सज्ज होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी गोलंदाजी केली. भिवंडीतील मैदानात रंगलेल्या या सामन्यात (Cricket Match) कपिल पाटील यांनी टिच्चून बोलिंग केली, मात्र बराच वेळ दानवेंची विकेट काढणं त्यांना शक्य झालं नाही. कारण रावसाहेब एकामागून एक फटके मारतच होते. या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, मात्र पाटलांनी दाजींची विकेट काढली का, याबाबत समर्थकांना लागलेली उत्सुकता व्हिडीओमध्ये तरी शमत नाही.

‘बोलं’दाज दानवेंची फलंदाजी

भिवंडीत रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. रावसाहेब दानवेंसाठी फटकेबाजी नवीन नाही. राजकीय मैदानात ते आपल्या बोलण्याने समोरच्याला गार करतात. एकामागून एक तुफान किश्श्यांची फटकेबाजी ते नेहमी करत असतातच, पण दाजींना क्रिकेट खेळताना पाहण्याचीही त्यांच्या समर्थकांना सवय आहे. याआधी बबनराव लोणीकरांसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

भिवंडीत आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने रावसाहेब दानवेंनी हजेरी लावली होती. यावेळी मैदानात उतरण्याचा मोह त्यांना आवरला नाही. भिवंडीचे भाजप खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बोलिंग केली, तर दानवेंनी फटकेबाजी केली.

सरपंच ते केंद्रीय मंत्री

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली आहे. 1990 ते 1995 आणि 1995 ते 1999 या दोन टर्ममध्ये ते भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री, कोण आहेत रावसाहेब दानवे?