Thane crime : दारूसाठी चखना आणून दिला नाही, म्हणून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण; कल्याणमधला व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Jul 23, 2022 | 2:56 PM

याचाच राग मनात ठेवून दारू पार्टी करणाऱ्या तरुणांनी रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करायला गेलेली रोहनची बहीण सोनाली हिलादेखील मारहाण करण्यात आली.

Thane crime : दारूसाठी चखना आणून दिला नाही, म्हणून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण; कल्याणमधला व्हिडिओ व्हायरल
भाऊ-बहिणीला मारहाण करताना मद्यधुंद जमाव
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : दारूसाठी चखना आणून दिला नाही, म्हणून एका अल्पवयीन तरुणाला आणि त्याचा बहिणीला बेदम मारहाण (Beaten) करण्यात आली आहे. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आता या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कल्याण पश्चिमेतील (Kalyan west) उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर परिसरात शुक्रवारीच्या रात्री सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका इमारती खाली काही तरूण दारूची पार्टी करत होते. यादरम्यान रोहन चव्हाण हा तरूण आपली बहीण सोनाली चौरेसोबत काही कामानिमित्त रस्त्यावर जात असताना पार्टी (Party) करणाऱ्या तरुणांपैकी एकाने रोहनला दहा रुपये दिले आणि दुकानातून चखना आणून दे, असे सांगितले. तर सोनाली यांनी आपल्या भावाला दुकानात जाऊ दिले नाही.

सहा जण ताब्यात

याचाच राग मनात ठेवून दारू पार्टी करणाऱ्या तरुणांनी रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्यस्थी करायला गेलेली रोहनची बहीण सोनाली हिलादेखील मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकारची घटना एका नागरिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच त्यांनी या आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

कठोर कारवाईची मागणी

व्हायरल व्हिडिओमध्ये मारहाणीची तीव्रता दिसून येते. तरुणांच्या जमावाने या भाऊ-बहिणाला बेदम मारहाण केली आहे. अक्षरश: लाथाबुक्क्यांनी दोघांनाही मारले आहे. आधी भावाला मारहाण केली. त्यात बहिणीने मध्यस्थी केली म्हणून तिलाही मारहाण करण्यात आली आहे. तरुणांच्या या कृत्यावरून त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसून येत आहे. इमारतीवरील एकाने ही घटना कॅमेऱ्यात चित्रित केली. आतापर्यंत तरी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र व्हिडिओमध्ये सहाहून अधिक जण मारहाण करताना दिसत आहेत. या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.