Eknath Shinde Banner : कल्याण-डोंबिवलीत डोंबिवलीत एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी

| Updated on: Jun 23, 2022 | 12:10 AM

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या गोटात शांतता असली तरी आज शिंदे समर्थकांकडून आज बॅनरबाजी करण्यात आली.

Eknath Shinde Banner : कल्याण-डोंबिवलीत डोंबिवलीत एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी
कल्याण-डोंबिवलीत डोंबिवलीत एकनाथ शिंदे समर्थकांकडून बॅनरबाजी
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर एकीकडे शिवसैनिकांनी वेट अन्ड वॉचची भूमिका घेतलेली असतानाच आता शिंदे समर्थक (Shinde Supporters) शिवसैनिकांनी समर्थनाचे बॅनर (Banner) लावले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र आता डोंबिवलीत काही दिवसापूर्वी मनसेमधून शिवसेनेत आलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, राजेश मुणगेकर या चार शिवसैनिकांनी डोंबिवलीत बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिलेले बॅनर लावले आहेत.

या बॅनरवर “लोकांचा लोकनाथ एकनाथ. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे मा. एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा ! साहेब आगे बढो, हम आपके साथ है !” असे लिहून होर्डिंग्ज लावत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे.

डोंबिवली पाठोपाठ कल्याणमध्ये शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व असून एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण डोंबिवलीत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या गोटात शांतता असली तरी आज शिंदे समर्थकांकडून आज बॅनरबाजी करण्यात आली. कल्याणमध्ये देखील भगवे बॅनर लावण्यात आलेत. कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व परिसरात हे बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलंय. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ पदाधिकारी व शिवसैनिक देखील शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरल्याचे सध्या दिसून येतंय. (Eknath Shinde supporters put up banners in Kalyan-Dombivali)

हे सुद्धा वाचा