AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारेगाव, कळवा परिसरातील सुशोभिकरण, साफसफाई, कळवा खाडी पूल कामाची आयुक्तांकडून पाहणी

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील फुटपाथची दुरुस्ती, मुख्य ररस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची देखील पाहणी करून आढावा घेतला.

खारेगाव, कळवा परिसरातील सुशोभिकरण, साफसफाई, कळवा खाडी पूल कामाची आयुक्तांकडून पाहणी
महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्माImage Credit source: TV 9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 28, 2022 | 3:56 PM
Share

ठाणे : शहरातील स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांचा दैनंदिन पाहणी (Inspection) दौरा सुरूच असून आज कळवा परिसरातील विविध भागांना भेटी देवून रेतीबंदर घाट, सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या परिसरातील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, फुटपाथची दुरुस्ती, दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रोड, साईनाथ नगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक आदी ठिकाणांची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. (Inspection of works in Kharegaon, Kalwa area and Kalwa creek bridge work by the Commissioner)

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला

यावेळी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील फुटपाथची दुरुस्ती, मुख्य ररस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची देखील पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी हॉस्पिटलची किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

कळवा खाडी नवीन पूलाचीही केली पाहणी

वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या कळवा खाडी नवीन पूलाचीही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी पाहणी करून सद्यस्थितीतील कामाचा वेग वाढवून मे महिना अखेर पूलाची एक लेन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मनोज तायडे, धनाजी मोदे, विकास ढोले, महेश अमृतकर, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, आगर व्यवस्थापक दिलीप कानडे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. (Inspection of works in Kharegaon, Kalwa area and Kalwa creek bridge work by the Commissioner)

इतर बातम्या

Parbhani Crime : परभणीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

Revenge | बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ