AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर परिणाम भोगावे लागतील’, मनसे आमदार राजू पाटलांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

भिवंडी कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे (MNS MLA Raju Patil warn to officers).

'...तर परिणाम भोगावे लागतील', मनसे आमदार राजू पाटलांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 18, 2021 | 3:41 PM
Share

कल्याण (ठाणे) :कल्याण शीळ रस्ताचे सहापदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. हे काम प्रचंड संथ गतीने सुरु आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर खाजगी संस्थेची रस्त्याची गुणवत्ता तपास करणार. त्यामध्ये गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास त्याचे परिमाण भागोवे लागतील”, असा सज्जड दम मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि कंत्रटदाराला दिला आहे (MNS MLA Raju Patil warn to officers).

नेमकं प्रकरण काय?

भिवंडी कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम संथगतीने सुरु आहे. हे काम कधी पूर्ण होणार याबाबत अनेक तारखा देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. काही दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह संचालक विजय वाघमारे आले होते. त्यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात एक जंबो बैठक घेतली होती. त्या बैठकीपश्चात त्यांनी हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला होता (MNS MLA Raju Patil warn to officers).

आमदार राजू पाटलांची अधिकाऱ्यांसोबत शीळ रस्त्याची पाहणी

आमदार राजू पाटील यांनी आज राज्य रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांसोबत कल्याण शीळ रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या आजूबाजूला कल्वर्ट तयार केलेले नाही. त्यामुळे बॉटलनेक तयार झालेला आहे. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात कल्वर्ट न केल्याने पाणी साचणार. हे पावसाळ्यात उघड होणार आहे. हे काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी न होता. आणखीन एक पावसाळ्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

निकृष्ट दर्जाचे काम, राजू पाटलांचा आरोप

“काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम आहे. ज्या ठिकाणी सिमेंट क्रॉन्क्रीटीकरण केले आहे. त्याठिकाणी आता भेगा पडल्या आहे. अधिकाऱ्यांना चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काम पूर्ण झाल्यावरही खाजगी संस्थेच्या माध्यमातून कामाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. त्यात काही निकृष्टता आढळून आल्यास त्याचे परिमाण संबंधितांना भोगावे लागतील”, असा सज्जड दम आमदार पाटील यांनी दिला.

हेही वाचा : जळगावात भाजपचे 27 नगरसेवक कसे फुटले, 15 संख्याबळ असताना शिवसेनेचा महापौर कसा? आतल्या घडामोडी काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली